प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

By | January 10, 2018

what prakash ambedkar hide in his press conference today1

संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांच्याच जीवाला धोका असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती पत्रकारांना दिली. बेलगाम हिंदुत्ववादी संघटनांना वेळीच आवरले नाही तर त्यांचे दहशतवादी गटात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे देखील ते म्हणाले .

भिडे गुरुजींच्या एका समर्थकाने केलेल्या पोस्ट चा हवाला देत प्रकाश आंबेडकर यांनी हे म्हटले. भिडे गुरुजींच्या एका समर्थकाने एका फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीष बापट आणि सुधींद्र कुलकर्णी यांची हत्येला प्रोत्साहन देणारे पोस्ट केलेलं होते, त्याचा हवाला आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला .मात्र ह्या समर्थकाच्या बाकी पोस्ट बहुतांश शिवसेनेच्या बाजूच्या आहेत त्याबद्दल किंवा शिवसेनेच्याबद्दल प्रकाश आंबेडकर काही बोलले नाही. केवळ हिंदू दहशतवादी ,हिंदुत्ववादी असे करतच त्यांनी पत्रकार परिषद संपवली. एकदाही शिवसेनेचे नाव घेतले नाही. (त्या व्यक्तीचे नाव देऊन वाद निर्माण करायचा नाही म्हणून नाव दिलेले नाही ).

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदू संघटनांवर समाजाचे नियंत्रण आहे. मात्र, मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचे बंधन नाही. आपला हेतू साध्य झाला नाही तर या संघटनांचे कार्यकते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवरण घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा. आजच्या देखील टीकेचा रोख हा संघ व सनातन संस्थेकडेच होता.

  • संबधित बातम्या

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

आरोप कशाच्या आधारे ? प्रकाश आंबेडकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

मुख्य्यमंत्री फडणवीस यांना जीवे मारण्याबाबत तसेच कोरेगाव हिंसाचार प्रकरणासंदर्भात विविध पोस्ट सोशल मिडीयात झळकत असतानाही पोलिसांनी ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचवली नाही. त्यामुळे पुणे शहर पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पुणे ग्रामीणचे अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक आणि गुप्तवार्ता विभाग प्रमुखांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी कोंबिंग आॅपरेशन थांबविले नाही. कोंबिंग आॅपरेशन ही लष्करी कारवाई आहे. कायद्यानुसार नागरी भागात अशा प्रकारची कारवाई करता येत नाही. महाराष्ट्र बंदनंतर आतापर्यंत तीन हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत १२५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात १६ वर्षाखालील १६ मुलांचा समावेश आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील ते म्हणाले.

अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी मला एका पोस्टवरून दहशतवादी ठरवण्याच्या वाक्याचा संबधित व्यक्तीने देखील परत एक पोस्ट टाकून चांगला समाचार घेतला आहे तसेच इतर पोस्ट देखील वाचाव्यात असे प्रकाश आंबेडकर यांना सुचवले आहे. तसेच जितक्या वेळा प्रकाश आंबेडकर निवडणुका लढले आहेत तेवढे मत उदयनराजे यांना २०१४ ला पडलेले आहेत त्यामुळे त्यांनी आपले हसे करून घेऊ नये, असा देखील सल्ला प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा