महात्मा गांधीजींबद्दल महेंद्रसिंह धोनी काय म्हणतो ?

By | October 2, 2017

what mahendra singh dhoni think about mahatma gandhi

गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी . गांधी जयंतीच्या निमित्ताने धोनी ने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव बीबीसी शी बोलताना उलगडून सांगितला. महेंद्रसिंग धोनी च्या मते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद. गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा निश्चय करतात. अनेकांना त्यात यश येतं तर काही भरकटतात पण जर आपण आपल्या आयुष्यात एखादं ध्येय ठेवलं असेल तर त्याच्या सिद्धीसाठी जीवतोड मेहनत घेणं आणि ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे.

धोनी म्हणतो , वेळ आणि काळ जरी बदलला असला तरी महात्मा गांधींचे विचार मात्र आजही समर्पक आहेत. गांधीजींची सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणजे ‘वर्तमानात जगा’. जे घडलंय त्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि जे घडणार आहे त्यावरही नाही. पण वर्तमानावर, म्हणजे जे मी आत्ता करणार आहे त्यावर आपलं शंभर टक्के नियंत्रण असतं.त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा किंवा भविष्याची खूप अधिक चिंता करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रीत करावं. तसंच आपलं सर्वोत्तम देऊन भविष्य सुधारण्यावर आपला जोर असावा असं महेंद्रसिंग धोनी सांगतो.

धोनी पुढे म्हणाला , आजचं जग हे खूप निकालदर्शी आहे. आपल्याला जर चांगले मार्क मिळाले किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल चांगला लागला तरंच आपण ती व्यक्ती यशस्वी असल्याचं प्रमाण मानतो. पण आपल्याला हे अजिबात पटत नसल्याचं धोनी सांगतो. ‘पूर्ण समर्पण म्हणजेच पूर्ण यश’ ही गांधीजींची शिकवण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाची असल्याचं माही म्हणतो . जर आपण आपल्याबाजून सर्व प्रयत्न केले असतील तर जो काही निकाल येईल तो आपण मान्य केला पाहिजे. इतकंच नाही तर केवळ निकालावरुन कोणाचीही पात्रता ठरवली जाऊ नये .

टीमचं नेतृत्व करताना गांधीजींच्या याच विचारांनी धोनीला शक्ती आणि प्रेरणा दिली. धोणीच्या आयुष्यात आणि त्याच्या विचारात बदल घडवला तो गांधीजींच्या आणखी एका तत्त्वानं – ‘प्रामाणिक मतभिन्नता’. सगळेच जण आपल्यासारखा विचार करतील किंवा त्यांनी करावा, अशी अपेक्षा करणं हाच मूर्खपणा ठरेल, असं माहीत प्रांजळ मत आहे . टीम सिलेक्शन असो किंवा मॅचमधल्या कॉम्बिनेशनची गोष्ट असो, मला जे वाटतं त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही. आणि त्यामुळे प्रामाणिक मतभेद असणं आणि ते मान्य करणं, हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं महेंद्रसिंग धोनी म्हणतो.

@@ पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .. शेअर करा @@

 

--Ads--

Leave a Reply