कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

By | November 21, 2017

what kopardi accused said in court

कोपर्डीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करून खून केला गेला होता .या नंतर सर्व मराठा समाज आरोपींच्या विरोधात रस्त्यावर एकवटला होता. मराठा मूक क्रांती मोर्चाची सुरवात होण्याचे हे एक मुख्य कारण ठरले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर आज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर बलात्कार व खुनाचा आरोप असलेले आरोपी जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले.

उद्या ह्या प्रकारांमधील तिन्ही आरोपींच्या शिक्षेबाबत सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करत आहेत . त्यानंतर शिक्षा सुनावण्यात येईल.

यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याच्यातर्फे अ‍ॅड. योहान मकासरे बाजू मांडत आहेत . मकासरे म्हणाले, आरोपीला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो सराईत गुन्हेगार नाही. त्याच्या घरी आई, पत्नी आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याला फाशी न देता जन्मठेप द्यावी, असा युक्तिवाद केला.

यातील आणखी एक सूत्रधार नितीन भैलुमे याच्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी बाजू मांडली , ते म्हणाले, आरोपी सराईत गुन्हेगार नाही. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे़ त्याचे वय अवघे २६ वर्ष आहे. त्याच्या घरात आई, वडील आहेत. आईचे आॅपरेशन झालेले आहे. वडील बाहेर गेल्यानंतर आईची काळजी घ्यायला कोणीही नाही. हे गरीब कुटूंब आहे. या घटनेमुळे त्याचे आयुष्य उद्धवस्त झालेले आहे. त्याच्या भविष्याचा विचार करुन त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी. भैलुमेविरोधात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नाही. सर्व परिस्थीतीजन्य पुरावे आहेत़.

दिल्ली येथील निर्भया प्रकरणात देखील परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने मान्य करूनच शिक्षा दिली होती.

दोघा वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे यांना त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत विचारले असता त्या दोघांनीही निर्दोष असल्याचे सांगितले. तर जितेंद्र शिंदे याला शिक्षेबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘शिक्षा एक दिवसाची काय किंवा हजार दिवसाची काय?’

उद्या ह्या प्रकरणाचा निकाल येणार असून , न्यायालयाकडे कोणती शिक्षा मागायची याबद्दल अजून काही ठरवले नाही, असे सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना २ दिवसांपूर्वी सांगितले होते.मात्र जनभावना लक्षात घेता व गुन्ह्याचे क्रौर्य बघता फाशीचीच शिक्षा द्यावी असे बहुतांश लोकांचे मत आहे . जेणेकरून भविष्यात अशा गोष्टीना लगाम लागू शकेल .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?