चक्क ८०० किमी प्रवास करून केली ‘ ह्या ‘ ग्राहकाची रस्त्यात धुलाई : व्हिडिओ आणि बातमी

By | January 12, 2018

website owner beats customer over negative feedback

चीन आर्थिक महासत्ता असल्याचे कितीही डांगोरे पिटत असले तरी चीनच्या नागरिकांची मानसिकता अजूनदेखील १८ व्या शतकातच आहोत कि काय अशी आहे . अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे . चीनमधील एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरून एका महिलेने एक वस्तू मागवली. ही वस्तू ह्या महिलेला प्रॉमिस केलेल्या वेळेमध्ये मिळाली नाही म्हणून तिने वेबसाईटच्या फीडबॅक मध्ये जात निगेटिव्ह कमेंट केली. मात्र तिची ही निगेटिव्ह कमेंट ह्या वेबसाईटच्या मालकास चांगलीच झोंबली आणि त्याने तिला धडा शिकवण्याचा निर्धार केला. आपल्याकडे देखील असे प्रकार होत असतात मात्र ह्या थरापर्यंत काही गोष्टी जात नाहीत.

ज्या महिलेने ही वस्तू मागवली ती चीनच्या झेंगझाऊ प्रांतात राहनारी असून तिचे नाव शियाओ ली आहे . तिने ज्या वेबसाईटवरून वस्तू मागवली तिचे कार्यालय झेंगझाऊ पासून तब्बल ८०० किलोमीटर लांब आहे . अर्थात तिला ही वस्तू मिळाली मात्र थोडी उशिरा . त्यामुळे तिने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार केली व तिची दखल घेतली नाही म्हणून कमेंट मध्ये निगेटिव्ह फीडबॅक दिला. मालकाला याचा राग आला आणि त्याने तिला धडाच शिकवायचा निर्णय घेतला. त्यासाठी कंपनीचा मालक तब्बल ८०० किलोमीटर प्रवास करत गेला आणि जेव्हा त्याला शियाओ ली भेटली तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला चढवला.

  • संबंधित बातम्या

वाढदिवसाच्या दिवशीच फोटो काढायच्या नादात तब्बल १५० फूट दरीत कोसळला :पहा व्हिडिओ

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

शियाओ रस्त्यावरून चाललेली असताना अचानक ह्या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. एका मागोमाग एक अनेक वेळा तिला फटके मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्लामुळे शियाओ जमिनीवर पडली. त्यानंतरही ह्याचा राग शांत झाला नव्हता .त्याने तिला लाथांनी मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात शियाओ गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे. झांग (वेबसाईटचा मालक ) याने मला मेसेज करुन धडा शिकवण्याची धमकी दिली होती असा दावा जखमी शियाओने केला आहे..अर्थात ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून ह्या हल्लेखोर वेबसाईटच्या मालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केवळ शियाओला मारण्यासाठी झांगने रात्रभर प्रवास केला. या प्रकरणात हल्लेखोर झांगवर काय कारवाई करण्यात आली या संदर्भात कोणतीही माहिती हाती आलेली नाही. मात्र चीनमधील विकृत वृत्तीचा आणखी एक नमुना जगासमोर आला असे म्हणावे लागेल .

  • संबंधित बातम्या

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

गुड न्यूज :व्हॉटसअॅप वापरणाऱ्यांसाठी ‘ ही ‘ गोड बातमी

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा