मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकणार नाही, देणार जशास तसे उत्तर : फेरीवाले आक्रमक

By | November 23, 2017

we will not silent if manse workers attacks us hawkers union mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेरिवाला हटाव मोहिमेच्या विरोधात आता फेरीवाले देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे . याआधी देखील फेरीवाल्यानी मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना गाठून मारहाण केली होती. डोक्यात रॉड ने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे मात्र आक्रमक असून, यापुढे फेरीवाले विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत .

फेरीवाल्यानी एकजूट केली असून मनसेची गुंडगिरी आम्ही मोडून काढू अशी धमकी देखील दिली आहे. मनसे च्या मारहाणीला यापुढे जशास तसे उत्तर देण्याची तयारी फेरीवाल्यांनी केली आहे . राज ठाकरे यांचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन सामान्य फेरिवाल्यांवर हल्ले करीत आहेत, हे आम्ही खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांच्या या बेकायदा भूमिकेला पोलीस, महापालिका, राज्य सरकार व न्यायालय सुद्धा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाठींबा देत आहेत. त्यामुळे आम्ही येत्या 29 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात भव्य धरणे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती फेरिवाला एकजूट संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील विविध फेरिवाला संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष समितीची स्थापना केली आहे.यातील बहुतांश सर्वच पदाधिकारी हे उत्तर भारतीयच आहेत.

एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी मरण पावले. पण या दुर्घटनेसाठी फेरिवाले जबाबदार असल्याचे कोणत्याही चौकशी अहवालात नमूद केलेले नाही. त्यामुळे फक्त फेरीवाल्यांमुळेच ही दुर्घटना झालेली नाही मात्र तरीही सगळे खापर फेरीवाल्याच्या माथी फोडून राज ठाकरे यांनी फेरिवाल्यांच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे.

फेरिवाल्यांना अधिकृत करण्याबाबत केंद्र सरकारने 2014 मध्ये कायदा मंजूर केला आहे. त्यानुसार 2014 पर्यंत कार्यरत असलेले सर्व फेरिवाले अधिकृत आहेत. मात्र फेरीवाल्याना जागा निश्चित करून अधिकृत परवाने दिले जावेत अशी आमची मागणी असल्याचे , पदाधीकारी महेंद्र सिंग यांनी सांगितले.

राज ठाकरे यांचे कार्यकर्ते गोरगरीब फेरिवाल्यांना मारहाण करतात. अशा वेळी फेरीवाल्यानी आत्मसंरक्षण केले कि गुन्हे लावले जातात हे गुन्हे परत घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली. फेरिवाल्यांकडून पोलिस, महापालिका व अन्य लोक हप्ता वसुली करतात. यात सुमारे 2000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांचा हा आरोप खरा असल्याची कबूली दयाशंकर सिंह यांनी यावेळी दिली. मात्र फेरीवाल्यांना जागा अधिकृतपने ठरवून द्याव्यात अशीही त्यांनी मागणी केली.

‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?