‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

By | November 16, 2017

future of manse nagarsevak will be decided on 14 november

रातोरात मनसेला जय महाराष्ट्र करून गेलेले ते ६ नगरसेवक सध्या शिवसेनेत असले तरी पक्षांतर करण्याऱ्या ह्या ६ नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडं याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आपले स्पष्टीकरण देताना ह्या सहा नगरसेवकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याने आम्ही अस्वस्थ होतो. आम्हाला पक्षाच्या कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेतले जात नव्हते, अशा शब्दात या नगरसेवकांनी राज ठाकरे यांचं नेतृत्वावर ताशेरे ओढले आहेत.आम्ही मनसेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलो, मात्र पक्षातील पदांबाबत तसेच वेळोवेळी होणाऱ्या निर्णयांबाबत आमच्यात अस्वस्थता होती, आम्हाला कधीही विश्वासात घेतले गेले नाही.

तसेच ,मराठी माणूस मुंबईच्या महापौरपदी राहणे आवश्यक आहे, असे सांगत दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र लेखी दिलेल्या उत्तरात त्यांनी यासंदर्भात काही लिहलेले नाही.

  • काय आहे प्रकरण ?

भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा काटा भाजपकडे झुकत असताना शिवसेनेने अचानक सर्वांनाच हादरा देत मनसेचे तब्बल ७ नगरसेवक फोडले आणि मुंबई महापौर पदाच्या भाजपच्या स्वप्नांना धुळीस मिळवले . फोडाफोडीच्या राजकारणामुळे मनसेची वाताहत झाली सोबतच भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न देखील भंगले गेले.

मनसेकडून मुंबईच्या दादर परिसरात पोस्टरद्वारे शिवसेनेवर हल्ला करण्यात आला . मनसेच्या फुटलेल्या नगरसेवकांना मनसेकडून छक्क्यांची उपमा देण्यात आली . ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’असं लिहिलेलं पोस्टर येथे लावण्यात आले.

पुढे मनसे कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर गर्दी करीत, शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  भाजपा सत्तेच्या जवळ जात असल्याचे चित्र असताना, शिवसेनेने अचानक खेळी करत ६ नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. पालिकेत मनसेचा केवळ एकच नगरसेवक उरला उरल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप झाला होता.

पुढे मनसेने आक्रमक होत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली व त्यावर ह्या नगरसेवकांकडून स्पष्टीकरण मागवले होते.

दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे ही या नगरसेवकांची नावे आहेत. मात्र आज कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनामध्ये वरील प्रमाणे कारणे देण्यात आली .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?