सलमान खान व शिल्पा शेट्टीवर वर ऍट्रिसिटीचा गुन्हा ? – काय आहे प्रकरण

By | December 23, 2017

walmiki samuyaad demands to file atrocity against salman khan

सलमान खान व कतरीना कैफ चा टायगर जिंदा है चित्रपट आता शुक्रवारी रिलीज झाला आहे . चित्रपटाला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी सलमान खान व शिल्पा शेट्टी हिने केलेल्या वादग्रस्त कमेंट मुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाजच रोष सहन करावा लागतोय. चित्रपटाच्या प्रोमोशनच्या दरम्यान सलमान ने ही वादग्रस्त टिप्पणी वाल्किमी समाजाबद्दल केली होती. त्यामुळे अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी हे एका नवीन वादात अडकले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

सलमान आणि शिल्पाने वाल्मिकी समाजाबद्दल ही आक्षेपार्ह टिपण्णी टीव्ही शो कार्यक्रमांदरम्यान केली होती. ह्या शब्दाने सर्व वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत व त्यांनी समाजाची माफी मागावी अशी वाल्मिकी समाजाची मागणी आहे.पुण्यात पिंपरी चिंचवडमधील आंबेडकर चौकात सलमान आणि शिल्पाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या ह्या दुर्दैवी विधानाचा निषेध करण्यात आला आणि या दोघांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

सलमान आणि शिल्पाने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी- चिंचवडच्या अखिल वाल्मिकी समाजाने यावेळी केली. आपल्या डान्सच्या टॅलेंट ची तुलना करताना सलमान कडून ही चूक झाली तर शिल्पा शेट्टी हिला घरी कशी दिसते हे विचारले असता , तिने देखील आपत्तीजनक उत्तर दिले होते . सलमानच्या टायगर जिंदा है च्या विरोधात जयपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली असून टायगर जिंदा है चे पोस्टर व सलमानचे फोटो देखील जाळण्यात आले. अखिल भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने सलमान व शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात राजस्थानच्या पाली मध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. शिवाय तो व्हिडिओ देखील पोलिसांकडे पुरावा म्हणून देण्यात आला आहे.

याआधी देखील मराठी चित्रपट देवा ला स्क्रीन मिळू दिल्या नाहीत अशी तक्रार ह्या चित्रपटाचे वितरक विरुद्ध देण्यात आली होती. मनसे ने हस्तक्षेप करत हा मुद्दा लावून धरला व देवा सोबतच टायगर जिंदा है रिलीज झाला. मात्र कायम चित्रपट प्रदर्शनाच्या वेळीच असे का केले जाते , हे देखील एक प्रकारचे प्रोमोशनच असल्याचे चाणाक्ष प्रेक्षक आता समजायला लागले आहेत. मात्र एखाद्याच्या जातीवरून खराब टिपण्णीचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत डेट करतोय हा मराठी अभिनेता

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा