गुरमीत राम रहीमचा गुरु निघाला वीरेंद्र दीक्षित : १६००० महिलांशी ठेवायचे होते संबंध

By | December 27, 2017

virendra dev dixit desire to keep physical relations with 16000 females

बाबागिरी करणाऱ्यांचे बुरे दिन आले आहेत. गुरमीत राम रहीम नंतर दिल्लीतील स्वयंघोषित बाबा वीरेंद्र दीक्षित याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विकृतीमध्ये हा राम रहीमचा देखील गुरु असावा असे याचे कारनामे आहेत . गुरमीत राम रहीम सारखे, याचे देखील रोज नवीन किस्से समोर येत असून ह्या बाबाला १६ हजार महिलांशी शारीरिक संबध प्रस्थापित करायचे होते असे समजते. दिल्लीतील विजय विहार परिसरात याचा आश्रम आहे. आध्यात्मिक विश्वविद्यालय हे जरी आश्रमाचे नाव असले तरी आध्यात्मिक असे यात काहीच नाही . विजय विहार विभागात राहणाऱ्या आध्यात्मिक विश्वविद्यालय नावाने आश्रम चालविणाऱ्या वीरेंद्र देव दीक्षित याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या स्वयंघोषित बाबाचे अनेक कारनामे समोर आले आहेत.

स्वयंघोषित बाबा वीरेंद्र दीक्षितच्या विरोधात याचिका दाखल करणारी राज्यस्थानी महिला असून ही ह्या बाबाच्या आश्रमात अनुयायी होती. तिच्या चार मुली देखील इथे आश्रमात होत्या. यामध्ये तिची एक अल्पवयीन मुलगीदेखील होती. बाबाने आपल्यासोबत जबरदस्ती व अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. व मग आईने ह्या बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली. ह्या विकृत बाबाला ड्रग घेऊन बलात्कार करणे तसेच न्यूड मुलींकडून मालिश करून घेणे असे आवडत असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.

अर्थात , ह्या बोगस आश्रमाचे धागेदोरे फक्त दिल्लीपर्यंत नसून उत्तर प्रदेशातही बाबाचे असे आश्रम आहेत. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फरुखाबाद आणि कंपील येथील आश्रमात छापा मारून आश्रमातील तळघरातून ३३ महिला आणि १२ पुरुषांची सुटका केली आहे.अध्यात्माच्या नावावर हा महिला व मुलींना कोंडून ठेवत होता व त्यांच्यावर अत्याचार करत होता. ढोंगी बाबा वीरेंद्र दीक्षित उत्तर प्रदेश मधील आश्रमात लपून बसल्याची प्राथमिक माहिती होती त्यामुळे ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. त्यावेळी बाबाच्या भक्तगणांनी पोलिसांना आत येण्यास मज्जाव केला मात्र पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला . आश्रमातील खोल्यांचे कुलुपे तोडून आता शिरले असता तळघरात तब्बल ६ महिलांना बंदिस्त केल्याचे आढळून आले. बाबाच्या ह्या आश्रमात काही अश्शील पुस्तके तसेच आक्षेपार्ह अशा वस्तू देखील आढळून आल्या आहेत.इतरही काही अश्रामावर पोलिसांनी छापे टाकले असून सगळी कडे मिळून आतापर्यंत ३३ महिला व १२ पुरुषांची मुक्तता करण्यात आली आहे.

अर्थात ही सर्व माहिती प्राथमिक असून, जसा जसा तपास पुढे जाईल तसे तसे याचे एक एक कारनामे पुढे येतीलच.

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?