भारतीय तरुणाचा ९०० स्क्वेअर मैलाचा देश ..स्वतः राजा वडील पंतप्रधान आणि लोकसंख्या दोन

By | November 15, 2017

viral news kingdom of dixit my suyash dixit of indore

एका भारतीय तरुणाने स्वतःला एका देशाचा राजा घोषित करत जागेवर कब्जा केला आहे. ह्या भागाचे क्षेत्रफळ ९०० स्क्वेअर मैल असून हा देश इजिप्त आणि सुदानच्या मध्ये निर्मित केला आहे. आता संयुक्त राष्ट्राने याला मान्यता द्यावी असे या तरुणाचे म्हणणे आहे . ह्या तरुणाचे नाव सुयश दीक्षित असे असल्याचे समजते . सुयश हा मूळचा इंन्दोर चा रहिवासी आहे . आता जर तुम्हाला माझा देश हवा असेल तर माझ्याशी युद्ध करून जिंकून घ्या अशीही घोषणा सुयश ने केली आहे . सुयशच्या ह्या देशाची लोकसंख्या आज फक्त दोन आहे . (सुयश आणि त्याचे वडील )

इंदौर येथील सुयश दिक्षित नावाच्या या तरुणाने इजिप्त आणि सुदान देशांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत एक देश असल्याचे स्वत:च घोषित केले. एक फेसबुक पोस्टही त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ही जागा इजिप्त आणि सुदान ह्या दोन देशांच्या मध्ये असून इजिप्त व सुदान ह्या दोन्ही देशांनी अद्याप ह्या जागेवर मालकी हक्क सांगितलं नव्हता त्यामुळे सुयश च्या हे लक्षात आले आणि त्याने तिथे जाऊन स्वतंत्र देश घोषित केला. या तरूणाने जागेवर हक्क सांगत तो माझा देश असल्याचे जाहीर केले आहे.या देशाचे नाव ‘किंग्डम ऑफ दिक्षित’ असल्याचेही त्याने फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले. बिर ताविल नावाचा हा भाग ‘नो मॅन्स लँड’ म्हणजे ज्यावर कोणाचाही मालकी हक्क नसलेला भाग आहे. याच संधीचा फायदा घेत सुयशनं त्या जागेवर स्वत:ची मालकी सांगितली.

स्वतःला राजा घोषित केल्यावर त्याने तिथे आपला झेंडाही फडकवला. युनायटेड नेशन्सने या देशाला मान्यता द्यावी अशी त्याची इच्छा आहे.अर्थात हा सर्व प्रदेश वाळवंटी असून क्षेत्रफळ ९०० स्क्वेअर मैल आहे. सुयशने याठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षाच्या बिया आणून झाडे लावायलाही सुरुवात केली आहे. सुयशने आपल्या वडिलांची या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री म्हणून घोषणा केली आहे.  त्याने आपल्या देशाची वेबसाईटही तयार केली असून माझ्या देशातील काही पदे रिक्त असून तुम्ही त्या पदांसाठी अर्ज करु शकता असे त्याने सांगितले आहे.

आता या नव्या देशाची लोकसंख्या केवळ दोन आहे.सुयशने राजधानीचे नाव सुयशपूर असे ठेवले आहे. या प्रदेशात प्रथम पाल हा प्राणी दिसल्याने या देशाचा राष्ट्रीय प्राणी पाल असल्याचे तो म्हणतो. सुयश दीक्षित हा आय.टी. क्षेत्रात कार्यरत आहे . फेसबुकवर या ‘देशाचे’ फोटो पोस्ट करत त्याने स्वतःला राजा घोषित केलं आहे.

मी इथे आरामात राहू शकतो, असं सुशयने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी नियम पाळत या जागेवर अधिकृतरित्या झाड लावलं आहे, त्यामुळे हा माझा देश झाला आहे ,जर कोणाला हा परत मिळवायचा असेल, तर युद्ध करा असं आवाहनही त्याने केलं आहे.

सुयशने स्वतःच्या देशाची https://kingdomofdixit.gov.best अशी वेबसाईट तयार केली आहे. देशातील अनेक पदं रिक्त असून कोणीही अर्ज करु शकते, असं सुयशने म्हटलं आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्याशी बोलण्याची आपली इच्छा असल्याचे देखील सुयश म्हणतो. तसेच आपण ह्या देशाच्या नागरिकत्वा साठी देखील अर्ज करू शकता, त्याची लिंक देखील सुयश ने त्याच्या वेबसाईटवर दिली आहे.

मात्र एखाद्या देशाला मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे खालील निकष असतात

1. कायमस्वरुपी लोकसंख्या असली पाहिजे
2. प्रदेशाची हद्द कोणत्याही वादात नसली पाहिजे
3. शासनव्यवस्था असली पाहिजे.
4. इतर देशांशी संबंध प्रस्थापित करण्याची तयारी असली पाहिजे.
अर्थात सुयशचा देश यातील कोणते निकष पाळतोय , हे सध्या तरी दिसत नाही. यापूर्वी देखील असे काही चमत्कारीक प्रकार घडले आहेत, मात्र संयुक्त राष्ट्राने कोणालाही मान्यता दिलेली नाही .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?