मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या नावाखाली सरकारचे ‘ हे ‘ उद्योग : विखे पाटलांचा आरोप

By | February 13, 2018

vikhe patils targets raj thakare over keeping silence on marathi movie dashkriya

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबईची रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि नागपूरच्या शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्थानाच का देण्यात आली,असा प्रश्न उपस्थित करून हा सर्वेक्षणाच्या नावाखाली मराठा समाजात संघामार्फत भाजपचा प्रचार करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील यांनी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे . मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम देताना टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस आणि गोखले इन्स्टिट्युटसारख्या दर्जेदार व नामांकित संस्थांना बाजूला सारण्यात आले. मुंबई आणि कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर विदर्भात शारदा कन्सलटन्सीला हे काम देण्यात आले. ह्या दोन्ही संस्था ह्या संघाशी संबंधित असून मराठा आरक्षणाच्या सर्व्हेच्या नावाखाली संघांशी संबंधित संस्थांची घरे भरण्याचाही कार्यक्रम सुरू झाला आहे. मागील तीन वर्ष सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्यावर घोळ घालते आहे.

नागपूरच्या शारदा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचा तर या क्षेत्रात शून्य अनुभव आहे मात्र ह्या संस्थेचे संचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले आहेत. विदर्भ डेव्हलपमेंट बोर्डावरही त्यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांच्याच संस्थेला शासकीय सर्वेक्षणाचे काम दिले जाते, हा शासकीय नियमांचा भंग आहे असे देखील ते पुढे म्हणाले.

संघाच्या शाखेत गोळवलकर आणि हेडगेवारांचे फोटो लावतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे लावली जात नाही. मुख्य म्हणजे संघाचा आरक्षणालाच वैचारिक विरोध आहे. तरीही संघाशी संबंधित संस्थांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वेक्षणाचे काम देण्यात आले, हे मराठा समाजाचे आणि आरक्षणाच्या मागणीचे दुर्दैव आहे.अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस मंत्रालय केशवसृष्टीत भरेल आणि विधीमंडळाची अधिवेशने रेशीमबागेत होतील. सरकारने यासंदर्भात तातडीने स्पष्टीकरण करावे. तसेच या संस्थांना दिलेले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम रद्द करून त्यासाठी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस किंवा गोखले इन्स्टिट्युटसारख्या दर्जेदार व नामांकित संस्थांना नियुक्त करावे, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे .

या पत्रकार परिषदेला पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष कमलताई व्यवहारे, माजी आमदार दिप्तीताई चौधरी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आबा बागूल आदी नेते उपस्थित होते.

तर मग राज ठाकरे यांनाच का शिवसेनेत घेत नाही ? : शिवसेनेला खडा सवाल

पदर ढळल्यावर ऑफर यायचीच ह्या टीकेला एकनाथ खडसे यांचे ‘ हे ‘ प्रत्युत्तर

धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे?

‘ ही ‘ एक गोष्ट राष्ट्रवादी विसरून गेली : बावनकुळे व रावल यांच्यावर ३०२ लावण्याची मागणी

इंटरनेटवर धमाल उडवून देणारी ही पोरगी आहे तरी कोण ? : पूर्ण माहिती

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा