२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

By | January 3, 2018

vijaystambh of dalit people in koregaon bheema dispute causes

कोरेगाव भीमाला झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते . सुमारे २५ गाड्या पेटवून देण्यात आल्या तर ५० पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड झाली. यात एका तरुणास आपला प्राण देखील गमवावा लागला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. युवकाच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्रानी दिले आहे , तसेच ह्या तरुणाच्या कुटुंबास १० लाखाची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे .

  • २०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ?

ज्या विजयस्तंभाकडे जाताना ही दुर्दैवी घटना घडली तो स्तंभ हा इंग्रजांनी उभारलेला असून इंग्रजांच्या बाजूने पेशव्यांच्या विरोधात महार बटालियनचे काही लढवय्ये लढले होते व त्यांच्यापुढे पेशवाईला हार पत्करावी लागली असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. मात्र ह्या घटनेने दलित समाजामध्ये आत्मविश्वास जागा झाला आणि आपण पेशवाईला टक्कर देऊ शकतो, ही त्यांची खात्री झाली.

१ जानेवारी १८१८ ला ही लढाई पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झाली होती. पेशवाईच्या काळात महार समुदायावर मोठा अन्याय झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत . पेशवाई असताना महार समुदायास पाठीला झाडू बांधून व गळ्यात मडके बांधून शहरात प्रवेश करावा लागत असे. त्यांच्या पावलांच्या खुणा दिसू नयेत व त्यांच्या थुंकणे मुळे शहर खराब होऊ नये यासाठी ही जुलमी पद्धत त्यांच्यावर लादली होती. त्यामुळे महार समुदायास पेशवाईबद्दल तसाही रोष होताच . इंग्रजांच्या मदतीने त्यांनी पेशवाईच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यात त्यांनी विजय मिळवला असे दलित समुदायाचे म्हणणे आहे . महार बटालियन इंग्रजांच्या बाजूने लढली असली आणि इंग्रज हे परके असले तरी समुदायासाठी ही लढाई आत्मसन्मानाची जास्त होती, तो ह्या लढाईत विजय मिळवून त्यांनी मिळवला. त्यांच्या मदतीची जाण ठेवून इंग्रजानी हा विजयस्तंभ उभारला. असे बोलले जाते कि या लढाईच्या वेळी एका रात्रीत हे सैनिक ४३ किलोमीटर पायी चालत गेले होते . पेशवाईच्या काही हजार सैन्याच्या विरोधात महार रेजिमेंटमध्ये फक्त ८०० सैनिक होते.

त्यानंतर हा विजयस्तंभ हा दलितांसाठी प्रेरणा देणारे ठिकाण बनले. दलित राजकीय व्यासपीठ म्हणून पुढे याचा वापर होऊ लागला. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी मायावती देखील आपल्या होत्या . त्यांनी देखील इथे हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना म्हणावे असे यश आले नाही आणि परत त्यांनी उत्तर प्रदेश मध्येच लक्ष देणे पसंत केले. राजकारण काहीही असो मात्र आजदेखील हा विजयस्तंभ दलित व शोषितांस प्रेरणा देण्याचे काम करत आहे.

  • विरोध का ?

महार बटालियन ही इंग्रजांच्या बाजूने लढली होती. इंग्रज हे देशाचे शत्रू होते. स्वकियांशी लढा देऊन स्वकीयांना पराभूत करून विजय दिन साजरे का करावेत ? अशी देखील काही जणांची भूमिका आहे, मात्र हाच न्याय लावायचा झाला तर पाठीला झाडू बांधणारे देखील स्वकीयच होते हे देखील सत्य नाकारून चालणार नाही .

आपल्यावरील आरोपांबद्दल मिलिंद एकबोटे काय म्हणतात ? : कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

पोलिसांची ‘ ह्या ‘ मदरश्यावर धडक कारवाई : तब्बल ५१ मुलींना ठेवले होते डांबून

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा