चल हॅट..भाजपचे नेते गावठी कुत्र्यासारखे ,गडकरी व मोदी यांचाही केला एकेरी उल्लेख

By | November 9, 2017

vijay wadettiwar creates controversy in akrosh melawa nagpur compares bjp leaders as dogs

सत्तेची नशा असली आपण काय आणि कोठे बोलतोय याचे भान राहत नाही. सरकार काँग्रेसचे असो किंवा भाजपचे . राजकीय नेत्यांचा भाषणाचा तोरा हा आक्रमकच असतो मात्र समोर कार्यकर्ते असले कि यांच्या अंगात येते आणि जिभेवरचे नियंत्रण निघून जाते . जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता शिवराळ भाषेत बोलण्याचा पराक्रम विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नागपूर येथील काँग्रेसच्या आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेत्यांची भाषा घसरल्याचे दिसून आले. भाजप नेत्यांना गावठी कुत्र्याची उपमा देत विजय वडेट्टीवारांनी शिवराळ भाषा वापरली तर विलास मुत्तेमवार यांनीदेखील अशाच पद्धतीची अनेक मुक्ताफळे उधळली.

नोटबंदीच्या वर्षपूर्ती झाल्याबद्दल काँग्रेसच्या आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि विलास मुत्तेमवार यांनी भाजप नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केलीये. भाजपवाले हे गावठी कुत्र्यासारखे आहेत. आपण घाबरलो की अंगावर येतात आणि दगड उचलला की दूर पळतात, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी भाजप नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरलीये. नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांचा देखील एकेरी उल्लेख केला गेला. काही शब्द महिलांना मान खाली घालावी लागेल असे देखील होते मात्र ह्या नेत्यांना त्याचा विसर पडला होता कि काय , अशा आवेशाने ते बोलत होते.

इन्कम टॅक्सच्या ४० नोटीसा पाठवल्या पण माझं काहीच बिघडलं नाही, अशी फुशारकी मारताना ‘ चाल हट्ट ..’ असे बोलताना पुढे त्यांची जिभेची भाषेची पातळी घसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतःला मर्द का बच्चा म्हणतात. मात्र नोटबंदीच्या दिवशी त्यांच्यातला मर्द का बच्चा कुठे गेला होता, असं विचारताना मुत्तेमवारांनी गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्याची ही शिवराळ भाषा एकूण लोक टाळ्या वाजवत असले तरी सत्तेबाहेर असताना देखील त्यांची जर अशी गुर्मी असेल तर सत्तेत आल्यावर काय ? असा प्रश्न देखील लोकांच्या मनात तयार झाल्याशिवाय राहत नाही.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र , इतक्या खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्या काँग्रेसची संस्कृती काय आहे हे दिसून येते, असा शब्दात उत्तर दिले आहे.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?