आणि ‘म्हणून ‘ वरूण धवन चक्क तेलगू मध्ये बोलला

By | September 21, 2017

varun dhawan

सलमान खानचा ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. ह्या चित्रपटात वरुण धवन सोबत तापसी पन्नु आणि जॅकलिन फर्नांडिस देखील आहे.

सलमान खान चा जुडवा बऱ्यापैकी गाजला होता आता वरुण धवन चा जुडवा काय कमाल करतो हे पाहु या .

मुंबईत कोसळणार्‍या पावसामुळे जुडवा २ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंट्सचे तीन तेरा वाजले. प्रचंड पावसामुळे अपेक्षेइतके प्रोमोशन करण्यात आले नाही .
कमी वेळात अधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी कलाकार आजकाल सर्व कलाकार सोशल मीडियाचा वापर करत आहेत.

हैदराबादला जुडवा २ च्या प्रमोशनसाठी नुकतीच टीम पोहचली होती. या प्रमोशनमध्ये वरुणने त्याला भविष्यात तेलगू सिनेमात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढचं बोलून वरूण थांबला नाही तर चक्क त्याने तेलगू बोलण्याचा थोडासा प्रयत्नही केला.

‘मला तेलगू सिनेमात काम करायचे आहे’हे वाक्य वरूण पहिल्याच फटक्यात अचूक बोलला. वरूणच्या या प्रयत्नाचे थोड़े कौतुकही झाले.

मराठी प्रोग्रॅम चला हवा येउ द्या मध्ये हिंदी कलाकार येतात आणि हिंदीमध्येच बोलतात. कारण त्यांनी मराठी प्रेक्षकाला गृहीत धरलेले असते.

‘टन टना टन’ आणि ‘उची है बिल्डिंग’ या चित्रपटातील नव्या स्वरूपातील गाण्यांना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे येत्या २९ सप्टेंबरला बॉक्सऑफिवर किती कमाल करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.