स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच असून नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोणतेही भवितव्य नाही. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, गेली २५ वर्षे नारायण राणे यांना मी ओळखतो. त्यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील घटनांवरून दिसून येते. राणेंइतकी लाचारी कोकणातील दुस-या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. कोकणात अनेक मोठे नेते होऊन गेले. राणे इतका लाचार दुसरा नेता पाहिला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांना कोकणचे नेते म्हणून म्हणून मुख्यमंत्री केले. पण पुढे जाऊन राणे शिवसेनेवर उलटले. ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला लागले. , असा आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेतमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने राणे यांना आमदार करायला विरोध केल्यामुळे राणे यांच्या तीळपापड झाला आहे. नीतेश राणे यांनी देखील काँग्रेसशी गद्दारी केली आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी प्रथम आमदारकीचा राजीनामा द्यावा.आम्ही आमची कर्ज काढून गाडी घेतली आहे. माडी विकणारे व संचयनी प्रकरणी अटकेत असलेल्यांकडे आलिशान गाड्या कशा आल्या, तसेच विधानसभा निवडणुकीत १२ जीप गाड्या कुठल्या पक्षातून आणल्या होत्या, असा खडा सवाल देखील वैभव नाईक यांनी केला.
केवळ लोकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून राणे काहीही बोलत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नारायण राणे काहीही वक्तव्य करीत आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान सुरू केलेले कारखाने बंद पडले आहेत. महिला उद्योगातून कारखाने काढले तेही सर्व बंद पडले. मात्र आम्ही कुडाळमध्ये भात प्रक्रिया गिरणी सुरू केली ती व्यवस्थित सुरू आहे. फिशरिजचा कारखाना सुरू केला तोही व्यवस्थित आहे, पण नारायण राणे यांनी सुरू केलेले सगळे कारखाने बंद पडले
उध्दव ठाकरे यांनी ठरवले तरच राणे आमदार किंवा मंत्री होतील. शिवसेनेशिवाय ते मंत्री होऊच शकत नाहीत. शिवसेनेचे २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचे राणे सांगत आहेत. शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही आणि कुणीही त्यांच्या सोबत जाणार नाही. राणे यांनी लाचारी गहाण ठेवलेली आहे. स्वार्थासाठी ते कुणाबरोबरही लाचार होतील.कणकवली बंद ठेवायला नारायण राणे यांचा विरोध होता तरीही कणकवलीवासीयांनी कणकवली बंद ठेवून प्रशासनाचा विरोध केला. नारायण राणे यांना कणकवलीवासीयांनी किंमत दिली नाही, त्याबद्दल कणकवलीवासीयांचे अभिनंदन करायला देखील वैभव नाईक विसरले नाहीत .
आता खूप झालं … नारायण राणेंनी आक्रमक होत उचलल ‘ हे ‘ पाऊल
शिवसेनेच्या नाकावर टिच्चून सरकार चालवल्याबद्दल ‘ यांनी ‘ केले फडणवीस यांचे अभिनंदन
फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे
नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून..राणे यांच्यावर हल्लाबोल
? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?