कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये नाव आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्याबद्दलच्या १५ माहित नसलेल्या गोष्टी

By | January 6, 2018

unknown facts about sambhaji bhide guruji

कोरेगाव भीमा येथील 200 व्या विजयस्तंभ शौर्य दिनी उद्भवलेल्या दंगलीमागे हिंदुत्त्ववादी संघटनांचे कटकारस्थान असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला, मात्र ह्या आरोपादाखल केवळ बोलण्यापलीकडे कुठलाही पुरावा आंबेडकर यांना देता आलेला नाही, पर्यायाने पुराव्याभावी देखील संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झालेली नाही. मात्र ह्या घटनेमुळे भिडे गुरुजींचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर अॅट्रासिटी, दंगल, हत्यारबंदी कायद्यांतर्गत या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

आज समजून घेऊ भिडे गुरुजींबद्दल काही माहिती

 • संभाजी भिडे सांगलीत राहत असून त्यांचे वय 80 आहे. त्यांचे मूळ नाव मनोहर असं आहे. भिडे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे.
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगलीतले तत्कालीन प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत . संभाजी भिडे 1980च्या दशकात संघामध्ये कार्यरत होते तसेच त्यांनी एमएस्सीपर्यंत शिक्षण केलेलं आहे . ते ( Atomic Science)मधील गोल्ड मेडिलिस्ट आहेत. संघाशी त्यांचे फार काळ पटू शकले नाही म्ह्णून त्यांनी प्रतिसंघाची स्थापना केली व संघाच्या दसरा संचलनाला पर्याय म्हणून दुर्गामाता दौड सुरू केली.
 • रामजन्मभूमी काळामध्ये भिडे यांच्या ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदुत्ववादी संघटनांना अभिप्रेत असलेला इतिहास ते लोकांना सांगतात.
 •  जून 2017 मध्ये पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोप भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेला आहे.
 •  2009 मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी ‘जोधा अकबर’ या सिनेमाला विरोध केला होता. त्यातून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन झाले होते.
 • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची स्थापना 1984 ला झाल्याची नोंद या संघटनेच्या वेबसाईटवर दिलेली आहे.
 • ‘हिंदू समाजाची उगवती तरुण पिढी शिवाजी, संभाजी रक्तगटाची बनवणे हेच श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ध्येय आहे,’ असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
 • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा, शिवराज्यभिषेक दिन असे विविध उपक्रम राबवले जात असल्याचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे
 •  भिडे गुरूजी यांची राहणी अत्यंत साधी असते.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भिडे यांची भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान रायगड इथं झाली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांची भेट याआधी घेतलेली आहे.
 • आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल व लाल बसने प्रवास. अखंड भ्रमंती, एकवेळ जेवण, तेही मिळाले तरच…
 • अंगात धग, रग, उर्मी शिल्लक असल्याने अंगरक्षकांची गरज नाही . शिवप्रभूंच्या स्पर्शाने पावन भूमीला पादत्राणे घालून अपवित्र करू नये म्हणून ते आजही अनवाणी फिरतात.
 • एक धोतर,सदरा,टोपी अंगावर, एक १० बाय १० च्या खोलीत राहतात. आत एक सतरंजी अंथरलेली, उशी घेत नाहीत.
 • वयाच्या 85 व्या वर्षीही एका ठिकाणी थांबत नाहीत, कार, गाडीत बसत नाहीत. परंतु गडकोट मोहीम काढतात ते दरवर्षी त्यात एकटे ५-६ दिवस अनवाणीच चालतात.
 • ते कोणत्याही राजकीय विचाराशी, संघटेनेशी जोडलेले नाहीत. मात्र, हिंदुत्त्व, धर्म, राजे शिवाजी महाराज याबाबत त्यांना प्रचंड आस्था आहे

.. तर हिंदूंच्या घरात देखील हाफिज सईद जन्माला येईल: प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा