कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

By | November 22, 2017

ujjwal nikam demands death sentence to kopardi rape & murder case criminals

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्या तिघांनाही फाशीची शिक्षा मिळावी असा युक्तिवाद आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत. यातही त्यांनी अफजल गुरु व संसदेवरील हल्ल्याचे देखील उदाहरण दिले .

आपली बाजू मांडताना निकम म्हणाले, ११ ते १३ जुलै २०१६ दरम्यान बलात्कार व हत्येचा कट दोषींनी रचला. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पीडित मुलगी व तिच्या मैत्रीणीला रस्त्यात अडविले. दोषी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला. बलात्काराच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला नेले. दोषी नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे जितेंद्र शिंदे याच्या राक्षसी कृत्याचा आनंद लुटत होते. मात्र त्यांनी जितेंद्र शिंदेला नंतर काम उरकण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर ह्या तिन्ही नराधमांनी त्या मुलीवर दोन दिवस पळत ठेवली., पीडित मुलगी १३ जुलैला सायंकाळी ७ वाजता पीडित मुलगी आपल्या आजोबांकडे मसाला आणण्यासाठी गेली होती, परत येत नसताना तिला गाठून तिच्यावर अत्याचार करण्यात आला .

मुलगी घरी आली नाही म्हणून शोध सुरु केला असता, रस्त्याच्या कडेला तिची सायकल दिसली. शेतातच मुलीचे प्रेत सापडले.तिचे हाथ खांद्यापासून निखळून मोडले होते , वक्षस्थळ व पाठीवर चावे घेण्यात आले होते व गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. दोषींनी नियोजनपूवर्क ही हत्या केली. यात जितेंद्र शिंदेला नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांनी त्याला साथ दिली, असे सांगत निकम यांनी तिघांनाही फाशीची शिक्षाच योग्य राहील, असे सांगितले.

युक्तिवाद करत असताना निकम यांनी इंदिरा गांधींची हत्या तसेच संसदेवरील हल्ल्याच्या खटल्याचे दाखले देखील दिले. त्यावेळी इंदिरा गांधीच्या हत्येमध्ये दोन अंगरक्षक सहभागी होते. तिसरा आरोपी तेहरसिंग हा घटनास्थळी नव्हता. मात्र, तो कटात सहभागी असल्याने त्यालादेखील फाशीचीच शिक्षा दिली होती.तसेच संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु हा देखील कटात सहभागी होता म्हणून त्यालाही दोषी ठरवून फाशी दिली होती. त्यामुळे मुख्य दोषी जितेंद्र शिंदे याच्यासह नितीन भवाळ व नितीन भैलुमे या दोघांनाही फाशी दिली जावी, अशी मागणी निकम यांनी केली.

तर संतोष भवाळ याच्या वतीने बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला़ दोषी हा घटनेत सहभागी असल्याचा कोणताही पुरावा न्यायालसमोर नाही़ तसेच ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना नाही. त्यामुळे आरोपीस फाशी देण्याइतका पुरावा नसल्यामुळे आरोपीस फाशी देऊ नये, असा युक्तिवाद बाळासाहेब खोपडे यांच्याकडून करण्यात आला.

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

फाशी कि जन्मठेप ? छकुलीची आई काय म्हणते ? : संपूर्ण कोपर्डी प्रकरण माहिती

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?