उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स : ‘ हे ‘ आहे प्रकरण

By | November 22, 2017

uddhav-thakare-sumons-with-sanjay-raut-maratha-kranti-morcha-cartoon-case

कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मराठा क्रांती मूक मोर्चा काढला. अत्यंत शांत व नियोजनबद्ध असे मराठा क्रांती मूक मोर्चा चे स्वरूप होते. कोणत्याही राजकीय पक्षाविना मराठा समाज एकत्र आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन सुद्धा कोणतीही हिंसा न घडणारा हा मोर्चा पुढे शांततामय आंदोलनाचे एक प्रतीक बनला. मात्र , शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रामध्ये श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी मराठा समाजाच्या ह्या मूक मोर्चाविषयी आक्षेपार्ह कार्टून काढले आणि त्यामुळे मराठा समाजच्या भावना दुखावल्या गेल्या. मात्र यामुळे आंदोलनांना कोणतेही हिंसक वळण लागले नाही.

याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी अशी समाजातून मागणी जोर धरत होती , मात्र संजय राऊत यांनी उद्दामपणे माफी मागण्याचा प्रश्नच नाही असे सांगून अजून भावना भडकवण्याचे काम केले. मराठा क्रांती मोर्चा आंदोलनामध्ये महिला व मुलींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता , त्यांच्या सहभागाबद्दल आक्षेपार्ह कार्टून काढून शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या सामनामधून मराठा समाजाच्या महिला भगिनींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या,मात्र शिवसेनेकडून मुजोरी दाखवत बरेच दिवस माफी मागितली गेली नाही.  पुढे बऱ्याच ठिकाणी समाजाकडून शिवसेनेच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली तर कित्येक पदाधिकाऱ्याने राजीनामे दिले होते . पुढे उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत व नाव घेत सपशेल माफी मागितली आणि ह्या वादावर पडदा पडला. मराठा समाजाने मोठे मन दाखवत त्यांना माफ देखील केले.

मात्र ह्या आक्षेपार्ह व्यंगचित्राविरोधात पुसद येथील अॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २६ सप्टेंबर २०१६ रोजी पुसद येथील न्यायालयात तक्रार केली होती. त्यात ‘सामना’मधील व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करत ‘सामना’चे संपादक तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांच्यावर पुसद न्यायालयाने समन्स बजावला आहे. भादंवीच्या ५०१ व ५०६ अंतर्गत हा समन्स बजावण्यात आला आहे.

आरक्षण तसेच ऍट्रॉसिटी चा खोटा गुन्हा सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा करावी अशी मराठा समाजाची मागणी होती तसेच कोपर्डीतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देऊन न्याय मिळाला अशी देखील मागणी होती. हे मोर्चे शांततेत निघाले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये या मोर्चाची टिंगल उडवत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशीत करण्यात आले होते. त्यावरून मराठा समाजातून संतप्त प्रतिक्र‌िया उमटल्या होत्या.

आता ह्या समन्सनुसार चौघांनाही १९ डिसेंबर रोजी पुसद न्यायालयात हजर व्हायचे आहे. पुरावे व साक्षीवरून चौघांना दोषी ठरवून न्यायालयाने समन्स पाठविले असल्याचे फिर्यादींचे वक‌िल अॅड. आशिष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

One thought on “उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चौघांविरुद्ध समन्स : ‘ हे ‘ आहे प्रकरण

  1. Pingback: ‘ आणि ‘ उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली : आले नेटीझन्सच्या रडारवर – Marathi People

Leave a Reply