नगरची जबाबदारी ‘ह्या’ अधिकाऱ्याकडे सोपवण्याची उद्धव ठाकरेंची मागणी नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

By | April 25, 2018

uddhav thakare demands krushna prakash in ahmednagar

गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या ‘देशाला अच्छे दिन’ येतील असं वाटत नाही, असा टोला लगावतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची हत्या झाली आहे. गुन्हे रोखण्यात देवेंद्र फडणवीस सरकारला सपशेल अपयश आलं आहे. हे सरकार बिनकामाचं असून हे नाकर्त्यांचं सरकार आहे .राज्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्री दिला पाहिजे, फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा असाच वाढत गेला तर शिवसैनिक कायदा हातात घेतील. अशी धमकी देखील उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिली आहे .

  • निकम यांनी खटला लढवावा

नगरमधील या दुहेरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, तसेच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला सोपविण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. हा खटला लढवण्यासाठी निकम यांना फोनवरून स्वतः विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठुबे आणि कोतकरांचे मारेकरी कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, अगदी सत्ताधारी पक्षातील असले तरी त्यांना पाठिशी घालता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी स्वत:चा अधिकार वापरून आरोपींना फासावर लटकावलेच पाहिजे.

नगरमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. लोकांवर दबाव टाकला जात आहे. असंच जर होत असेल तर शिवसैनिकांना नगरमध्ये ठाण मांडून बसावे लागेल. इथली गुंडगिरी मोडून काढावी लागेल, असं सांगतानाच कृष्ण प्रकाश सारख्या अधिकाऱ्याकडे अहमदनगरची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेनेच्या मंत्र्यांना सरकारमध्ये अधिकार नसल्याचं सांगण्यात येतं. पण आमच्या मंत्र्यांनी अधिकार दाखवायला सुरुवात केली तर त्यांच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित करू नका, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना हाणला.

  • शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही

केडगावचे प्रकरण राजकीय वैमनस्यातून नव्हे तर वैयक्तिक वादातून झाल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणत असतील तर त्यांनी तशी कोर्टात साक्ष द्यावी. नातीगोती सोडून त्यांनी साक्ष देण्यासाठी उभे राहावे, असं सांगतानाच कोतकर व ठुबे या दोघांच्याही कुटुंबियांची जबाबदारी शिवसनेने घेतली असून त्यांना आधार आणि ताकदही दिली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, नाणार प्रकल्पावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

सध्या भाजप बेकायदेशीर धंदेवाल्यांना पक्षात घेऊन त्यांचा वाल्मिकी करीत आहे. मात्र, हा वाल्मिकीचाही अपमान आहे. छत्रपती शिवरायांचे नाव घेत सत्तेवर आलेला भाजप प्रत्यक्षात मात्र मोगलाई पोसत आहे. अशा परिस्थिती राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची अवश्यकता असते. मात्र, हे पद मुख्यमंत्र्यांकडेच ठेवले आहे आणि मुख्यमंत्री सतत विकास कामांत व्यस्त असल्याने त्यांना माता-भगिनींचा आक्रोश ऐकू येत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. शिवरायांच्या राज्यात माता-भगिनींचे कुंकू पुसले जात नव्हते. मात्र सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे या सरकारला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

केडगावचा नगरसेवक विशाल कोतकरने ‘असा ‘ सांगितला घटनाक्रम : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरच्या केडगाव परिसरात रेल्वे कटिंगसह अन्य अकस्मात मृत्यू का थांबले ? शिवाजी शिर्के यांचा लेख : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा