सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

By | September 30, 2017

uddhav thakare dasara melawa

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे काही मुख्य अंश असे होते.

 1. निर्णय घेण्यासाठी मला मुहूर्ताची गरज नाही – उद्धव ठाकरे
 2. महागाईवरुन भाजपावर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका
 3. हिंदूंचा विश्वासघात करू नका, मराठी लोकांमध्ये फूट पाडू नका – उद्धव ठाकरे
 4. फुकटं वीज देणं खरंच शक्य आहे का ? – उद्धव ठाकरे
 5. मोदींच्या राज्यात कुणीही सुखी नाही, त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने काय दिलं? – उद्धव ठाकरे
 6. भाजपाची गोमांसाबाबत भूमिका काय – उद्धव ठाकरे
 7. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात गोमांस कमी पडणार नाही -उद्धव ठाकरे
 8. होय आम्ही सत्तेतही आणि विरोधातही – उद्धव ठाकरे
 9. जीएसटीबाबत आम्ही भाजपाला पाठिंबा दिला – उद्धव ठाकरे
 10. नोटबंदी कशासाठी आणि कुणासाठी – उद्धव ठाकरे
 11. काळा पैसा, भ्रष्टाचार अजूनही देशात तसाच आहे – उद्धव ठाकरे
 12. 8 ऑक्टोबरला नोटबंदी झाल्यानंतर 11 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सर्वप्रथम विरोध केला – उद्धव ठाकरे
 13. जीएसटीवेळी सेनेने भूमिका लावून धरली नसती, तर महापालिकांचं महसूल बुडालं असतं – उद्धव ठाकरे
 14. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं कामच आम्ही करतोय – उद्धव ठाकरे
 15. भाजपावाले म्हणतात, ‘वंदे मातरम्’ न बोलणं हा देशद्रोह नाही – उद्धव ठाकरे
 16. आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही – उद्धव ठाकरे
 17. इकडे सत्ता, तिकडे सत्ता, पण कारभार बेपत्ता – उद्धव ठाकरे
 18. मोहन भागवत यांना राष्ट्रपती का केलं नाही – – उद्धव ठाकरे
 19. रोहिंग्याची ब्याद इथे नकोय – उद्धव ठाकरे
 20. रोहिंग्या मुसलमान असले तर बांगलादेश त्यांना स्वीकारायला तयार नाही – उद्धव ठाकरे
 21. संपूर्ण देशात 5 वस्तूंचे भाव स्थिर ठेऊन दाखवा – उद्धव ठाकरे
 22. समान कर आहे मग इंधनाचे दर समान का नाहीत – उद्धव ठाकरे
 23. संपूर्ण देशात कारभाराचं चिखल – उद्धव ठाकरे
 24. काल हॉस्पिटलमध्ये प्रेतं पाहून शब्द फुटत नव्हते – उद्धव ठाकरे
 25. शिवसैनिक हे वडिलोपार्जित मिळालेली शस्त्रं – उद्धव ठाकरे
 26. काश्मीर ते कन्याकुमारी बुलेट ट्रेन करा – उद्धव ठाकरे
 27. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कशासाठी – उद्धव ठाकरे

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र मंत्री, आमदार हे सत्तेतून बाहेर पडण्यास तयार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणाचा आवाज ऐकून पुढे निर्णय देतात, हा औत्सुक्याचा विषय आहे.

@ पोस्ट आवडली असेल तर लाईक करा .. शेअर करा @