संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही : उदयनराजेंचा हल्लाबोल

By | January 5, 2018

udayanraje supports sambaji bhide guruji over koregaon bhima

भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरुजींच्या वरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

याबद्दल पुढे बोलताना राजे म्हणाले, संभाजी भिडे यांच्याबाबत मनात आदर आहे, ते मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रॉफेसर होते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर माझे गुरुजींसोबत बोलणे झाले, त्यावेळी बोलताना गुरुजी रडले. जातीच्या आधारावर देशाचे तुकडे होण्याआधी माझे डोळे मिटलेले बरे. देशाचे तुकडे झालेले मला सहन होणार नाही,. शिवाय समाजात तेढ निर्माण करणा-यांवर कारवाई व्हावी, हिंसाचारामुळे दोन हजार कोटींचं नुकसान झाले असून उद्रेक करणारी वक्तव्यं करु नयेत,अशी मागणीदेखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

शिवाजी महाराजांनी मुस्लीमांसह सगळ्या समाजातील लोकांना बरोबर घेतल्याचा दाखला देत आपणही सर्वांनी आपसातले मतभेद बाजुला ठेवून एकत्र रहायला हवं. उद्रेक करणारी भाषणबाजी टाळायला हवी आणि समाजात फूट पडणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान ,कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

संभाजी भिडे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या बीजमंत्राच्या आधारावर राष्ट्रजागृती करण्याचे काम आम्ही करतो. “कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत मी होतो व मी कारणीभूत आहे’, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेप्रमाणे गावोगावी त्यांच्या अनुयायांनी तोडफोड करून वाहने, घरे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस केला आहे. या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये माझे नाव कारणीभूत असल्याचे आंबेडकर बोलले आहेत. त्यांनी निराधार आरोप करून माझ्यावर अटकेची कारवाई करून गुन्हा नोंद करून, मला याकूब मेमनची वाट दाखवावी, अशी मागणी केली आहे.

माझी शासनाला विनंती आहे की, या घटनेची म्हणजेच बनावाची खोलात जाऊन पाळेमुळे शोधून चौकशी करावी. जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजी काय म्हणतात ? : पत्रक काढून दिले स्पष्टीकरण

रामदास आठवलेच यापुढे पॉवरफुल राहण्याची शक्यता : ‘ ही ‘आहेत कारणे

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

कोरेगाव भीमाच्या हिंसाचारामागील अदृश्य हात कुणाचे ? : तपास यंत्रणांचा काय अंदाज

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा