बापरे थंडी .. पांघरुणाखाली गुदमरून दोन भावांचा मृत्यू : महाराष्ट्रातील घटना

By | December 28, 2017

two kids died due to winter chadar in godia

महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची जोरदार लाट सुरु आहे. पहाटेच्या वेळी चक्क ४ अंशापर्यंत तापमान आले असून सगळ्यांना थंडीने गारठवले आहे . त्याने आजारी पडण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. साहजिकच चादर,रग, जर्किन,शाल यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे . मात्र अति पांघरून घेतल्याने दोन चिमुकल्यांवर अक्षरश: जीव गमावण्याची घटना महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये घडली असून याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

डेव्हिड पुंडे व त्याचा सख्खा भाऊ चहल पुंडे अशी ह्या दुर्दैवी भावांची नावे आहेत . ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धोबीटोला ह्या गावात घडली आहे.. मुलांना गाढ झोप लागली होती त्यात अंगावर गादी ओढल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यातूनच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.मात्र मुलांना गाढ झोप लागलेली असावी व झोपेत त्यांनी वजनाने बरीच जड असलेली अशी गादी अंगावर ओढली व नंतर त्याखालीच त्यांचा दम कोंडला गेला व श्वास घेणे असह्य होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा प्रथमदर्शनी तरी दिसते आहे.

दरम्यान गादी काढली असता, मोठ्या मुलाच्या तोंडामधून फेस येत होता त्यामुळे हा विषबाधेचा देखील प्रकार असू शकतो,असा देखील संशय आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर खरे कारण समोर येईलच.

महाराष्ट्रात थंडीची जोरदार लाट सुरु असल्याने बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चादर,रग, जर्किन,शाली आलेल्या आहेत. मात्र त्यासाठी जो धागा वापरला जातो तो बहुतांश वेळा कृत्रिम असतो त्यामुळे एकदा पांघरून घेतले की बाहेरची हवा म्हणावी तशी आत येत नाही, व तात्पुरते बरे वाटते मात्र काही वेळा नंतर श्वास घेण्यास त्रास सुरु होतो व तोंडावरून पांघरून काढावे लागते .अर्थात जास्त जाड रग घेण्याकडे लोकांचा कल असतो. उबदार वाटले पाहिजे मात्र जास्त जाड पांघरून घेतल्याने हा प्रकार झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे यापुढे जास्त जाड पांघरून घेण्यापेक्षा हलके व उबदार पांघरून घेणे जास्त श्रेयस्कर आहे.

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या ‘ ह्या ‘ बिलामध्ये आहे एक अशी गोष्ट जी आयुष्यभर लक्षात राहील

आपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? : ‘ हे ‘ आहे उत्तर

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?