‘ म्हणून ‘ झाले तुझ्यात जीव रंगला चे चित्रीकरण बंद

By | November 1, 2017

tuzyat jeev rangala shooting permission denied by grampanchayat

झी वरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ ह्या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय बोललं जातंय.झी मीडियाच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील वसगडेमध्ये या मालिकेचं चित्रीकरण अखंडीत सुरु होतं. मात्र अचानक वसगडे ग्रामपंचायतीनं कोणताही विचार न करता तडकाफडकी या मालीकेचं चित्रीकरण बंद करण्याचे आदेश देऊन पूर्ण टीम ला अडचणीत आणल्याचे बोलल जातंय .

मराठी कलानगरी अशी कोल्हापूरची ओळख आहे. याच कोल्हापूरला ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नवी ओळख मिळाली आहे. शिवाय चित्रीकरणामुळे काही तंत्रज्ञ, स्थानिक कलाकार आणि कामगार तसेच व्यावसायिक यांचादेखील हाती दोन पैसे खेळू लागले होते .

सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेडची निर्मीती असणाऱ्या तुझ्यात जीव रंगाला ही मालिका दर्शकांच्या देखील पसंतीस पडत आहे . हे सगळं सुरळीत सुरु असतानाच वसगडे ग्रामपंचायतीनं अचानक कोणतीही पुर्वकल्पना न देता २७ ऑक्टोंबरला नोटीस देऊन चित्रीकरण तातडीनं बंद करावे असे आदेश दिले आहेत . कारण दाखवताना ग्रामपंचायतीनं सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं सर्व अटीचा भंग केल्याचं म्हटले आहे, शिवाय ह्या मालिकेच्या चित्रीकरणामुळं स्थानिकांना त्रास होतो आहे असेही म्हटले आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच ही नोटीस आल्याने याला राजकारणाची झालर असल्याचं बोललं जातंय तर मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा परवानगी देण्याची मागणी स्थानिक कलाकरांनी केलीय.

वसगडे गावात असणारा वाडा मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना याचा त्रास होतं असल्याचं स्थानिक लोक सांगत आहेत . मात्र सोबो फिल्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या निर्मात्यांशी येणाऱ्या अडचणीवर चर्चेतून करुन मार्ग काढण्याची गरज होती.

आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं यामध्ये मध्यस्थीची भूमीका घेतलीय.अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या मध्यस्थीनंतर वसगडे गावच्या सरपंच आणि अन्य सदस्यांनी स्थानिकांशी चर्चा करुन यावर मार्ग काढता येईल का हे पहातो असं आश्वासन दिलयं.

वसगडेमधील ग्रामस्थांना मालिकेच्या चित्रीकरणामुळं त्रास होत होता. तर चर्चेतून मार्ग काढता येत होत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तात्काळ आणि तडकाफडकी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रीकरण रोखण्याचे आदेश दिलेत. त्यामुळेचं याला स्थानिक राजकारण भोवले असल्याची प्रतिक्रिया आता लोक देत आहेत .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?