सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या फोटोमागच सत्य ‘ हे ‘ आहे

By | October 10, 2017

जर हा फोटो तुम्ही पहिला असेल तर यामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा नक्की झाली असेल . आंध्र प्रदेश मधील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर अक्षरश हात जोडून उभा आहे .

आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील ही घटना असून बाईकवर बसलेल्या कुणीच हेल्मेट घातले नाही. कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी हा फोटो ट्विटरवर पोस्ट करत लिहिले आहे की, “बाईकस्वारासमोर हात जोडण्यापलिकडे पोलिस अधिकारी काय करु शकतो?”

बाईकस्वारासमोर हात जोडून असणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचं नाव शलभ कुमार आहे. शलभ कुमार हे अनंतपूरच्या मडाकसारियामध्ये पोलिस अधिकारी आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार , जेव्हा मी बाईकवर पाच जण बसल्याचे पाहिले, त्यावेळी मला प्रचंड राग आला. मात्र मी हतबल झालो आणि त्यांच्यासमोर केवळ हात जोडले. कारण मी तेच करु शकत होतो.”

ज्या बाईकस्वारासमोर पोलिस अधिकारी शलभ कुमारांनी हात जोडले आहेत, त्याचं नाव हनुमंत नायडू आहे. पोलिस अधिकारी शलभ कुमार यांनी बाईकस्वार हनुमंत नायडू यांच्यासमोर हात जोडले. त्यावेळी हनुमंत नायडू यांना देखील हसू आवरता आले नाही . त्यांचे चोरून हसणे देखील ह्या फोटो मध्ये कैद झालेले आहे.

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?