गोव्यात होणाऱ्या लूटीला पर्यटक वैतागले..’ ह्या ‘ गोष्टीला केली सुरुवात

By | December 11, 2017

maharashtra government plans to allow beach shack in kokan districts

गोवा हे लोकप्रिय पर्यटन स्थळ होण्याच्या पाठीमागचे सर्वाधिक मोठे कारण म्हणजे अप्रतिम असे निसर्ग सौन्दर्य आणि स्वच्छ बीचेस. गोव्यात जास्त पैसे खर्च करू शकतील अशा पर्यटकांनी जास्त प्रमाणात यावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार जाहिरातबाजी करते . मात्र आलेल्या पर्यटकांना योग्य भावात उत्कृष्ट जेवण आणि सुविधा तसेच सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ आहे . गोव्यामध्ये अमली पदार्थ, दारू यांची रेलचेल असली तरी चांगले जेवण आणि ते देखील योग्य भावात हे आजही पर्यटकांपुढचे मोठे आव्हान आहे . बाहेर १०० रुपयाच्या डिशेश गोव्यामध्ये ५०० रुपयाच्या पुढे आहेत, शिवाय दर्जा मात्र जेमतेमच , त्यामुळे गोवा फिरायचा तर खिसा चांगलाच जड ठेवून सुद्धा उपाशी राहायची देखील पाळी येऊ शकते .अर्थात सरकार देखील ह्या लुटीत काही प्रमाणात का होईना वाटेकरी असल्याने तेरी भी चूप आणि मेरी भी चूप अशा प्रकारे पर्यटकांची लूट सुरूच आहे .

मात्र आता अशा मनमानीला पर्यटक देखील कंटाळले असून किती दिवस तोंड दाबून खिशाची लूट सहन करायची असा प्रश्न आता पर्यटक उपस्थित करू लागले आहेत . त्यामुळे बहुतांश पर्यटक गोव्याला येतानाच घरून मटेरियल घेऊन येतात व जरा आडोसा तसेच फुटपाथवर स्वयंपाक करून आपले पोट भरतात .अर्थात पैसे देऊन देखील नीट अन्न मिळत नसल्याने त्यांनी हा मार्ग शोधला असला तरी त्यामुळे काही प्रमाणात का होईना तेथील पर्यटकांची होणारी लूट स्वकष्टाने कमी झाली आणि आता स्थानिक दर्जाहीन हॉटेल धारकांनी पर्यटकांच्या नावाने बोंबा मारायला सुरु केले आहे. आम्ही नीट योग्य भावात खाऊ घालणार नाही आणि तुम्हाला पण नीट खाऊ देणार नाही ,अशी अडेल भूमिका घेऊन सरकारपुढे प्रदूषण आणि स्वच्छता याचा आडोसा घेत पर्यटकांवर कारवाई केली जावी अशी भूमिका घेतली आहे.

पणजी व परिसरातील भागांमध्ये फुटपाथवर स्वयंपाक करताना काही पर्यटक आढळले होते. स्थानिक लोक व हॉटेल धारकांनी अशा पर्यटकांना आक्षेप घेतला आहे. देशी पर्यटक आपल्या बसगाड्या व अन्य वाहने रस्त्याच्या बाजूने उभ्या करतात व या फुटपाथवर थेट शेगडी ठेवून स्वयंपाक करतात असे स्थानिकांना आढळून आले होते . वाहने उभी करून वाहनांच्या मागे आडोशाला स्वयंपाक तयार केला जातो. तिथेच जेवण केले जाते.काही स्थानिक लोकांनी अशा पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक दिसतील अशा पद्धतीनेही वाहनांचे फोटो काढून ते फोटो सरकारच्या पर्यटन खात्याला पाठवले आहेत. अर्थात काही पर्यटक पदपथांवर नव्हे तर किनाऱ्यांवर बसून तिथेच स्वयंपाक करत आहेत. गोव्यात येतानाच ते मोठ्या प्रमाणात भांडी व कडधान्य घेऊन येतात आणि तिथेच स्वयंपाक करतात त्यामुळे निसर्गाची हानी होते व समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे परिमाण वाढते असा देखील स्थानिक लोकांचा आरोप आहे .

पर्यटकांना उघडय़ावर मद्यपान तसेच उघडय़ावर स्वयंपाक करू दिला जाणार नाही, असे दोन महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी होणे अवघड आहे . मुळातच जिथे पाण्याच्या दरात दारू मिळते तिथे हे शक्य तरी आहे का ? गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये नायजेरियन लोकांचा उपद्रव वाढला आहे . काही हॉटेल देखील ह्या मंडळींनी चालवायला घेतली असून त्याद्वारे अमली पदार्थाची देखील तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे . पोलीस मात्र ह्या लोकांवर कारवाई करण्या ऐवजी येणाऱ्या पर्यटकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असेल तर त्याचा गोवाच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

अर्थात आपल्या महाराष्ट्राला देखील गोव्यापेक्षा जास्त असा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र पर्यटन विकासासाठी म्हणावे असे प्रयत्न आजवर झाले नाहीत . कोकणच्या पर्यटनाकडे ध्यान दिले असते जाते कोकणवासीयांना मुंबई,पुणेमध्ये रोजगारासाठी यावे लागले नसते .

आपल्या कोकणातही अनुभवता येणार गोव्याची मजा : सरकारने केला ‘ हा ‘ मास्टरप्लॅन

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करणाऱ्या ‘ ह्या ‘ महिलेवर जोरदार चप्पलफेक

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?