तिबेटियन मार्केटच्या स्फोटानंतर नाशिक महापालिका आक्रमक : घेतला ‘ हा ‘ निर्णय

By | October 10, 2017

तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेला नियम व अटी याबद्दल जाग आली आहे .शनिवारी झालेल्या स्फोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसले, तरी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका जागरूक राहणार आहे. तिबेटियन मार्केटमध्ये झालेल्या स्फोटानंतर महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास गाळा जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले

तिबेटियन मार्केट मध्ये शनिवारी स्फोट झाला होता , त्यात तब्बल नऊ गाळ्यांचे नुकसान झाले होते. आतपर्यंत तरी प्राथमिक अंदाजानुसार हा स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचा अंदाज आहे . मात्र पोलीस दुसऱ्या बाजूनेही विचार करत आहेत .

महापालिका जेव्हा ग्राहकांना गाळा देते तेव्हा काही नियम व अटी घालून दिलेल्या असतात . त्या पाळण्याची जबाबदारी ही गाळा धारकावर असते.त्यात गाळ्यात ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत अशीही एक अट असते मात्र व्यवसाय करताना याचा विचार केला जात नाही. हे सर्व नियम बाजूला ठेवून व्यवसाय केला जातो . ज्या गाळ्यात स्फोट झाला त्याला तर नोटीस बजावली आहे, मात्र हा प्रकार गंभीर असल्याने यापुढे अशा प्रकारांची पुनरावृती टाळली जावी, म्हणून महापालिका कडक धोरण अवलंबणार आहे.

महापालिकेच्या सर्वच गाळ्यांची नियमांच्या अधीन राहून चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे . मनपाचे एकूण १२ व्यावसायिक संकुले आहेत, त्यात १ हजार ९०० पेक्षा जास्त गाळे आहेत. त्या सर्वांची तपासणी होणार असल्याचे समजते .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?