‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

By | November 1, 2017

the reason why sunny leone is always with her husband

पॉर्न इंडस्ट्री मधून बॉलिवूडमध्ये येत अभिनेत्री सनी लिओनीने जो काहीजम बसवला आहे ते सहज शक्य असणारी गोष्ट नाही. अर्थात आज सनी जिथे आहे आणि ज्या ब्रँडची ती जाहिरात करते त्या ब्रॅण्डला देखील सनीला तोडीस तोड देईल अशी दुसरी कोणी अभिनेत्री आज त्यांच्याकडे नाही .सनीच्या फॅन्स ला एक गोष्ट मात्र नेहमी जाणवत राहिलेली आहे , ती म्हणजे सनी लिओनी प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या पतीला का घेऊन जाते ? प्रोग्रॅम लहान असो व मोठा मात्र सनी चा पती डॅनियल सावलीसारखा कायम सनीच्या सोबत असतो .

भारतीय सौंदर्य आणि उत्तम नृत्यकौशल्याच्या बळावर सनी लिओनीने बॉलीवूड मध्ये आपलं स्थान भक्कम केलं. सनी लिओनीने काही जरी केलं तरी त्याची बॉलीवूड मध्ये धमाल प्रसिद्धी होते. शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘आयटम साँग’ केल्यानंतर आता सलमान खानच्या चित्रपटातही ती झळकणार आहे. सनीला बहुतांश कार्यक्रमांमध्ये पती डॅनियलसोबतच पाहिलं गेलं. मात्र ह्या कार्यक्रमांमध्ये डॅनियलला घेऊन जाण्यामागे एक विशेष कारण आहे.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सनी एक पॉर्नस्टार होती.पॉर्नस्टार म्हणून सनीची जुनी ओळख होती. बॉलीवूड मध्ये आल्यावर तिच्या पूर्वइतिहासामुळे तिला कित्येक अडचणीला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत सनी लिओनी ने सांगितलं होत कि , ‘त्यावेळी बॉलिवूड स्टार्स माझ्यापासून लांब पळायचे. इतकंच नाही तर फक्त हाय-हॅलो करण्यासाठीही ते कचरत होते. एक अस्पृश्य असल्याची भावना मनात निर्माण व्हायची. जेव्हा पहिल्या चित्रपटानंतर मी एका पुरस्कार सोहळ्यात गेले तेव्हा अनेक कलाकारांनी माझ्यासोबत बसण्यास आणि फोटो काढण्यासही नकार दिला होता जेव्हा मला स्टेजवर बोलावलं तेव्हा माझ्यासोबत उभं राहण्याचीही कोणाची इच्छा नव्हती. कारण मी एका अशा इंडस्ट्रीतून आली आहे जिथे लोकांना सन्मान मिळत नाही असं त्यावेळी अनेकांना वाटायचं. साक्षर लोकांनी अशी वागणूक देणं माझ्यासाठी धक्कादायक आणि तितकंच निराशाजनक होतं,’

मात्र सनी लिओनीचे हे दुःख तिच्या पतीने ओळखल, आपल्या बायकोला तिच्या पूर्वइतिहासामुळे समाजात खराब वागणूक मिळते हे त्याच्या लक्षात आले. यातून सनी खचून जाऊ नये, म्हणून डॅनियलने सावलीसारखी तिची साथ द्यायचे ठरवलं. जेव्हा कोणीच तिची साथ देण्यास पुढे सरसावत नव्हते, तेव्हा सनी पती डॅनियल ला सर्व कार्यक्रमांमध्ये सोबत घेऊन जाऊ लागली व तिच्यामध्ये आत्मविश्वास येत गेला .आज सनी लिओनी प्रसिद्ध झाली असली तरी तिच्या पतिने तिला योग्य वेळी साथ दिली म्हणून ती इथवर पोहचू शकली.

परपुरुषाशी बोलताना दिसली म्हणून बायकोवर संशय घेणाऱ्या आणि घटस्फोट किंवा बायकांना मारून टाकणाऱ्या भारतीय समाजाला हे एक आदर्श उदाहरण ठरू शकते .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?