सनी लिओनचा ‘ हा ‘ नवीन सिनेमा फक्त १८ वर्षापेक्षा पुढील व्यक्तींसाठीच

By | November 25, 2017

what sunny leone says about meetoo campaign for females

भारत सहकुटुंब सिनेमा पाहण्याचे दिवस निघून गेले असे वाटत असले तरी भारतीय सिनेमामध्ये देखील काही क्लास पडले आहेत. कुटुंबासहित चित्रपट पहायचा असेल तर त्यातील कलाकार व विषय हे पाहून आपण सहसा चित्रपटाला जातो. सनी लिओन च्या नशिबी अजून तरी असे चित्रपट आलेले नाहीत. अर्थात सनी देखील असाच भूमिका करत आहे किंबहुना तिला अशाच भूमिका मिळत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

24 नोव्हेंबर ला सनी लिओनचा ‘तेरा इंतजार ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला . मात्र हा चित्रपट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण पुरुषांना आणि मुलींना हा पाहता येणार नाही.कारण ह्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिलं आहे. याचा अर्थ फक्त प्रौढ लोकच हा सिनेमा पाहू शकतात. सेन्सॉर बोर्ड पूर्ण चित्रपट पाहून त्यासंदर्भात निर्णय घेत असते. त्यातील संभाषण , सीन , भावना दुखावणारे संवाद सगळे वगळून मग सिनेमा आपल्या भेटीला येतो. मात्र सनीच्या चित्रपटात फक्त प्रौढ व्यक्तींसाठी असेच सीन असतात, त्यामुळे ह्या चित्रपटाला ए चा दर्जा देण्यात आला. त्यामुळे फक्त 18 वर्षे आणि त्यापेक्षा मोठ्या व्यक्तींनाच थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी एन्ट्री मिळणार आहे.

यु प्रमाणपत्र पाहिजे असल्यास बरेच सीन कट करावे लागतील असे सेन्सॉर बोर्डाने सुचवले होते, मग हा सिनेमा सर्वांसाठी खुला झाला असता. मात्र हे सीन कट केले तर सिनेमा काही राहणारच नाही म्हणून शेवटी निर्मात्यांनी ए प्रमाणपत्रावर समाधान मानले. अर्थात चित्रपटाचे राईट्स आधीच विकले गेले आहेत. सिनेमातून हे बोल्ड सीन काढून टाकले तर सिनेमात काही अर्थ राहणार नाही असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

आपल्या हॉट अंदाजामुळे सनी सध्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे . विशेष म्हणजे तिच्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. सनीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शाहरूख खान याच्यासह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. वास्तविक हे सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी पोर्न इंडस्ट्रीची स्टार राहिली असून, आता ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे.

संबंधित बातम्या

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?