Tag Archives: tukaram mundhe

तुकाराम मुंढेना उच्च न्यायालयाने फटकारलं, मागावी लागली बिनशर्त माफी : काय आहे प्रकरण ?

उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही कारवाई केल्याने नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बिनशर्त माफी मागावी लागली आहे. तुकाराम मुंढे यांनी गोदावरी तीरावरील बांधकामावर कारवाई केली होती, ज्यामुळे न्यायालयाने त्यांना फटकारत स्थगिती असतानाही कारवाई का केली ? अशी विचारणा केली. सोबतच हे बांधकाम महापालिकेच्या खर्चातून पुन्हा आधीप्रमाणे उभे करून देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. उच्च… Read More »

आसाराम बापूचा महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ ठिकाणचा आश्रम तुकाराम मुंढे यांनी केला जमीनदोस्त

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला आसाराम बापूचा नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात गेले वीस वर्षे आश्रम होता. तिथले आसाराम बापूच्या नावाने भक्तांचे सगळे उपक्रम बिनदिक्कत सुरु होते. अनेक वेळा तक्रारी झाल्या मात्र कायदा वेळोवेळी कुचकामीच ठरला. दरम्यान या कालावधीत महापालिकेचे नऊ आयुक्त आले अन्‌ गेले मात्र आसाराम आश्रमाची वीटदेखील हलली नाही. मात्र, तुकाराम मुंढे यांनी आयुक्त… Read More »

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल माहिती नसेल तर माहित करून घ्या : का आहे लोकांचे समर्थन ?

पुण्याहून बदली होवून नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून आलेले तुकाराम मुंढे यांचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे, तर दुसरीकडे नाशिक शहरातील तरूण वर्गाचे सोशल मीडियावरून तुकाराम मुंढे यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळते आहे . आपल्या कामाला इतकी लोकप्रियता मिळेल याचा त्यांनी करीअर निवडते वेळी कदाचित अंदाज देखील केलेला नसेल. सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या नावाने… Read More »

मी सरकारी वेतनात समाधानी ..अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये : तुकाराम मुंढे यांचे आवाहन

सरकारकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये मी समाधानी असून बोनसच्या रुपात अतिरिक्त रक्कम स्वीकारत नाही, अधिकारी वर्गाने देखील बोनस घेऊ नये, असे सांगत पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांनाही बोनस न घेण्याचे आवाहन केले. मी नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना दिवाळीचा बोनस घेतला नव्हता. यावेळी माझ्यासोबत कार्यरत अधिकाऱ्यांनी बोनस नाकारला होता, असे सांगत त्यांनी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी बोनस घेऊ नये,… Read More »