Tag Archives: shivsena

‘ तर ‘ त्या सत्तेला लाथ मारून जाणार : उद्धव ठाकरे यांची गर्जना

शेतकऱ्याला सरकारचे उपकार नकोत. विजय मल्ल्यासारखी लोकं पळण्यापूर्वीच त्यांना पकडत नाही. पण शेतकऱ्यांने २०- २५ हजार रुपये थकवले तरी त्यांना नोटीस पाठवली जाते. राज्यातील जनता तडतफडते, तळमळते, विव्हळते, त्यांच्या आक्रोशाकडे आणि शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष देण्याची गरज आहे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर मी राजकारणात असलो किंवा नसलो तरी काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणालेत.… Read More »

आणि अखेर शिवसेनेच्या ‘ह्या ‘ मोठ्या नेत्याची आमदारकी झाली रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका प्रतिस्पर्धी उमेदवार कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.औरंगाबाद खंडपीठाने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात… Read More »

उद्धव ठाकरे -शरद पवार भेट ही दोन वैफ़ल्यग्रस्तांची भेट असल्याचा टोमणा

उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती .त्यावेळी पवार यांनी आधी तुम्ही भूमिका घ्या, असे उद्धव यांना सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता… Read More »

मनसेच्या त्या सहा नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार ‘ ही ‘ तारीख

मनसेने ‘शेलक्या’ शब्दात उपमा दिलेले आणि मनसे ला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत जाणारे नगरसेवक शिवसेनेत अखेर आले असले तरी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे .हे सहा नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले, मात्र मनसेने आक्रमक होत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे. मनसेतून शिवसेनेत… Read More »

फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो आणि त्यांचे घर चालते म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे . सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी म्हणून त्यांनी त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकलेला आहे. अशा शब्दात काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांना फटकारले आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात… Read More »

‘ तर ‘ उध्दव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडल्यापासून दोन्ही पक्षातले वाकयुद्ध सुरूच आहे . मात्र त्याची पातळी दिवसेदिवस दोन्ही बाजूनी घसरतच आहे .आता तर चक्क शिवसेनेने भाजपाला रावणाची उपमा दिली असून, भाजप पाठीमागून लढणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. निवडणुकांआधी देखील शिवसेनेने भाजपची तुलना अफजलखानाच्या फौजेसोबत केली होती. मात्र महाराष्ट्रातील जनतेने ना भाजप ना शिवसेना अशी कोंडी केल्यामुळे शेवटी… Read More »

शिवसेनेची गुजरात मधील भूमिका झाली स्पष्ट : ‘ यांना ‘ केला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्ता उपभोगायची आणि भाजपवर टीका देखील करत राहायची .शिवसेनेची ही भूमिका आता हळू हळू आपल्या देखील अंगवळणी पडलीय आहे . हा शिवसेनेचा डबल रोल गुजरात मध्ये देखील सुरु असल्याचे समजते . भाजपविरोधात पाटीदार समाजाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना शिवसेना आपला पाठिंबा देणार आहे . कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी तिखट… Read More »

ते सहा नगरसेवक शिवसेनेत येण्याचे ‘ हे ‘ होते कारण : उद्धव ठाकरे यांनी सांगितले गुपित

शिवसेना , भाजप व मनसे ह्या तीन पक्षांमधली भांडाभांडी मुंबईमध्ये कायम चालूच असते . मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यापासून मनसे शिवसेनेवर कडक शब्दात हल्ले करत असते तर हातातोंडाशी असलेला महापौर पदाचा घास शिवसेनेने पळवला म्हणून भाजप शिवसेनेवर खार खाऊन आहे. मात्र तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेत का… Read More »

शिवसेनेत येण्यासाठी देऊ केली होती रक्कम: ‘ ह्यांनी ‘ केली लाचलुचपत विभागात तक्रार दाखल

गेल्या आठवड्यात मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडून आपल्या तंबूत दाखल करून घेतले आहेत. मात्र मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे हे मात्र अद्यापही मनसे मधेच असून आपण समाधानी असल्याचे सांगितले. संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रक्कम देऊ केली होती, असा दावा संजय तुर्डे यांनी केला आहे . संजय… Read More »

आता पुढची टाळी गालावर : राज ठाकरे यांचा शिवसेनेवर जोरदार प्रहार

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते . नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी मला फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा… Read More »