Tag Archives: rashtrawadi congress

‘ अखेर ‘ पाकिस्तानची साखर ठेवलेले गोडाऊन राष्ट्रवादीकडून उध्वस्त : पाकिस्तानी साखर आयात प्रकरण

पाकिस्तानकडून साखार आयात करून तमाम १२५ कोटी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारकडून करण्यात आले होते. अखेर पाकिस्तानी साखरेचं गोदाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फो़डलं आहे. दहिसरमोरी गावात-डायघर परिसरातील गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड ही साखरेची गोण्या फोडताना दिसत आहेत. भारत सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे, त्याच साखरेचं गोडाऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडलं… Read More »

भुजबळांना केवळ जामीन, ते निर्दोष ठरले नाहीत ! पुन्हा तुरूंगाची हवा खातील- कोण म्हणाल असं ?

राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले छगन भुजबळ यांना 26 महिन्यानंतर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भुजबळांच्या नाशिकमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. मात्र, भुजबळांच्या जामीनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे . छगन भुजबळ यांना केवळ जामीन मंजूर झाला आहे. ते निर्दोष ठरले नाहीत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे काही… Read More »

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडाला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून जाऊन देखील अजून कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेले नाहीत. हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांपैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात असले तरी त्यांच्याकडून विसंगत माहिती मिळत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नगरकरांना अजूनही कुठलीच ठोस माहिती देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत . हत्याकांडाचा कट कुठे रचला ? सहभाग किती लोकांचा ? नेमका… Read More »

देशाचे कृषिमंत्री कोण आहेत ? अजित पवार यांच्या प्रश्नांवर मिळाले ‘ हे ‘ उत्तर

छत्रपतींच नाव भाजप सरकारला फक्त सत्तेसाठी हवं आहे.छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. मतांसाठी याचं काम सुरु असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जातींना बरोबर घेवून जाणारा, महिलांना न्याय-सन्मान देणारा आणि शेतकऱ्यांना पुढे नेणारा पक्ष आहे असे अजित पवार यांनी भुदरगड (कोल्हापूर ) इथे… Read More »

दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे : धनंजय मुंडेचे वादग्रस्त विधान

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. नगरमधील उसदरावरून पेटलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यावेळी दोन शेतकरी जखमी झाले होते . त्यात एकाच्या छातीत तर दुसऱ्याच्या हातावर हातावर जखम झाली होती. मात्र आता दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी… Read More »

कर्जमाफी म्हणजे ‘ लबाडाच्या घरचे आवतण ’ : कोण म्हणालय असं ?

सरकारची कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाच्या घरचे आवतण’ आहे. असले आवतण जेवल्याशिवाय काही खरे नसते. त्यामुळे कर्जमाफीचे जेवण कधी मिळेल याची शाश्वती नाही . संपूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी ‘ संपूर्ण ‘ शब्द काढून टाकला व सहा वेगवेगळे आदेश काढून अटी टाकल्या. त्यामुळे कर्जमाफी अधिक किचकट व अटींची झाली आहे ते शरद पवार यांनी अहमदनगर येथे… Read More »

शिवसेनेचा सत्तात्याग हाच एक मोठा विनोद

सत्तेत सहभागी असलेली शिवसेना ही नेहमी सत्तेतून बाहेर पडतो असे धमकावत असते. सेना सत्तेत राहून कायम भाजप सोबत भांडत असते . सेनेची ही धमकी म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे.मात्र नारायण राणे यांच्याबाबत त्यांनी काही न बोलणे पसंत केले . राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या पंढरपूर… Read More »