Tag Archives: raj thakare

मुजोर फेरीवाल्यांच्या निर्घृण हल्ल्यामध्ये वडिलांसोबत २ मुलांचा देखील मृत्यू : कुठे झाली घटना ?

फेरीवाल्यांची मुजोरी ही आता केवळ राजकीय विषय नसून त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना देखील सहन करावा लागतोय . मात्र भांडुपमध्ये ह्या हल्ल्यात चक्क फेरीवाल्यांच्या हल्ल्यामध्ये चक्क तीन नागरिकांना आपला प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . ह्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण झाले असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे . भांडूपचे रहिवासी असलेले अब्दुल… Read More »

ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. हे यश ईव्हीएम मशीनचीच करामत असल्याची टीका याआधी मायावती यांनी देखील केली होती आणि… Read More »

राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा, हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा

मुंबईतील फेरीवाला वादामध्ये आता एमआयएमने उडी घेतली आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा असल्याची टीका केली आहे. याचबरोबर हिम्मत असेल तर भायखळ्यामधे तोडफोड करून दाखवा असे आव्हान देखील दिले आहे . याआधीच मुंबई काँग्रेस व मनसे यामध्ये मोठा वाद चालू असून त्यात एमआयएमने आपली भूमिका मांडल्याने काँग्रेसला एक… Read More »

वाद चिघळला: संजय निरूपम यांना भटक्या कुत्र्याची उपमा देणारे मनसेचे फ्लेक्स होर्डिंग

मनसेकडून काल काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर, आज मध्यरात्री काही अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली.त्यामुळे मनसे विरुद्ध संजय निरूपम हा संघर्ष जास्त चिघळण्याचीच चिन्हे आहेत . तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेनं परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख असलेला भलामोठा फ्लेक्स उभारला आहे. अत्यंत खालच्या पातळीमध्ये संजय निरूपम यांची कुत्र्यासोबत केलेली तुलना… Read More »

मनसेच्या गुंडांनी काल पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम यांच्याकडून हल्ल्याचे समर्थन

काल मनसेच्या गुंडांनी पुन्हा विक्रोळीमध्ये मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी अशा शब्दात मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी ह्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यांनी हे समर्थन ट्विटद्वारे केले आहे. काळ रात्री २६ ला विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये… Read More »

डी.एस. कुलकर्णी यांच्याबाबतीत राज ठाकरे काय म्हणाले ?

डीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलय. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, ठेवीदारांनी त्यांना सहकार्य करावं.आज काही राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित अमराठी लोक त्यांना उध्वस्त करु पाहत आहेत. तसे होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला पाहीजे’ असे राज ठाकरे आज… Read More »

आमची ब्लूप्रिंट तर त्यांची ब्लू फिल्म :राज ठाकरे

आम्ही ब्लूप्रिंटचा प्रचार केला तर भाजपकडून गुजरातमध्ये ‘ब्लू फिल्म’ दाखवून प्रचार केला जात आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपाला आज ठाणे येथील सभेत टार्गेट केले. काँग्रेसच्या राहुल गांधींना ‘पप्पू’ समजता तर मग भाजपच्या नेत्यांची फौज गुजरातमध्ये येऊन काँग्रेसविरोधात का बोलते आहे?. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली?… Read More »

मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे लावायला पुण्यातून सुरुवात

पुणे येथे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या , त्यांचा माल रस्त्यावर फेकून त्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त झी मीडियाने दिले आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर हल्लाबोल केला होता. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा पॅटर्न मनसेने आता पुण्यात देखील राबवायला सुरु… Read More »

चक्क ग्रामपंचायतमध्ये मनसे ? : होय हे शक्य आहे

मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडल्यामुळे ,किल्ल्यामध्येच मनसेची पडझड होऊन मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, अशी कितीही चर्चा असली तरी, कोकणात तेही नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय. त्यामुळे बाकी सर्वांच्या विजय पराभवापेक्षा मनसेच्या विजयाची सर्वत्र चर्चा जोरदार आहे.आजवर मनसेचा प्रभाव हा शहरी मतदारांपर्यंत आणि प्रामुख्याने मुंबई, कल्याण ,पुणे… Read More »

मी मनसेचा .. पण मनसे ? : मनसे ज्यांनी सोडली ते काय बोलतात ?

मनसेच्या मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेला जो धक्का बसला आहे त्यातून मनसे यथावकाश सावरेल, पण नेत्यांनी मनसे सोडून जाण्याची ही पहिली वेळ नाही.यापूर्वी देखील बरेच नेत्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे . बीबीसी मराठीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ह्या नेत्यांशी भेटून मनसे सोडण्यापाठीमागची कारणे समजून घेतली. त्यावेळी प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले.  मनसेत दाबादाबीचं राजकारण –… Read More »