Tag Archives: pune news

अखेर डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत दिल्लीमध्ये अटक : पाच दिवसाची पोलीस कोठडी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नीसोबत अखेर अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शनिवारी सकाळीच पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना विमानाने पुण्यात आणण्यात आले.पुणे सत्र न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने या दोघांनाही 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आपल्याला… Read More »

पुण्याच्या उच्चभ्रू कुटुंबातील मुलीचे इसीस कनेक्शन : आजचा फसलेला प्लॅन ‘ हा ‘ होता

चित्र : प्रातिनिधिक आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधून एका १८ वर्षीय संशयित तरुणीला अटक करण्यात आली आहे. सादिया शेख असे ह्या तरुणीचे नाव असून सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसच्या संपर्कात आली होती आणि काश्मीर खोऱ्यात प्रजासत्ताक दिनी आत्मघाती हल्ला करण्याच्या तिचा इरादा होता असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी देखील कल्याण मधून काही युवक इसीससाठी भरती… Read More »

धक्कादायक : पुण्यात फ्लॅटमध्ये आय. टी. इंजिनिअरचा पत्नी व मुलासहीत मृतदेह आढळला

पुण्यातील बाणेर पाषाण लिंक रस्ता परिसरातीळ एका फ्लॅट मध्ये पती , पत्नी व लहान मुलगा मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे . पती संगणक अभियंता असून, त्याने पत्नी आणि मुलाचा खून करून मग स्वतःदेखील आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे . जयेशकुमार पटेल (वय ३४), पत्नी भूमिका पटेल (वय ३०) आणि नक्ष पटेल… Read More »

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

दिल्लीमधील जिग्नेशची हुंकार रॅली फ्लॉप झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी देखील जिग्नेश मेवाणीवर तोंडसुख घेतले आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीसाठी प्रशासनाने तब्बल १५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात केले होते मात्र उपस्थित राहणाऱ्या लोकांमध्ये या रॅलीबद्दल उत्साह नव्हता . देशभरातून ह्या हुंकार रॅली साठी फक्त २०० ते ३०० ची उपस्थिती होती. त्यापॆक्षा जास्त पत्रकार आणि पोलिसांची… Read More »

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

सेल्फी स्टिकच्या मदतीने शेजारच्यांच्या बेडरूम मधील खाजगी क्षण रेकॉर्ड करून नंतर त्या क्लिपच्या माध्यमातून महिलेला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत ब्लॅक मेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे . विशेष म्हणजे हा आरोपी एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मोठ्या हुद्दयावर असल्याचे समजते . हा आरोपी ह्या क्लिप्सच्या माध्यमातून महिलेला ब्लॅकमेल करत होता.… Read More »

अखेर अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम सापडला :पोलिसांचे मोठे यश

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकजणाला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव धायरीमध्ये घडलेल्या ह्या घटनेने पूर्ण पुणे हादरून गेले होते .अडीच वर्षाची मुलगी घरात वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. पुणे पोलीस गेले ३ दिवसांपासून ह्या नराधम आरोपीचा शोध… Read More »

पोटासाठी पुण्यात येऊन लेकरू गमावलं : लैंगिक अत्याचार करून खून

आई वडिलांच्या जवळ झोपलेल्या अडीच वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिचा निर्दयी खून केल्याची घटना वडगाव खुर्द ( पुणे ) येथे उघडकीस आली .तिचा मृतदेह घराशेजारील मोकळ्या जागेत आढळून आला. श्रुती विजय शिवनगे असे ह्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे . या प्रकरणी तिचे वडील विजय शिवणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा… Read More »

चिटफंडच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून ऑफिस बंद संचालक फरार

आकर्षक व्याजदर , २ वर्षात दामदुप्पट अशा आमिषाला सर्वसाधारण माणूस सहज बळी पडतो ते चतुर लोकांनी ओळखले आहे. सर्वसाधारण माणूस अशा स्वप्नांना लगेच भुलतो आणि सहज चोर लोकांच्या तावडीत सापडतो. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे… Read More »

जर मला आत पाठवले तर मी तुमचे पैसे कसे देऊ शकेल ? : डीएसके यांचा गुंतवणूकदारांना प्रश्न

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत. डीएसकेंतर्फे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाय पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढला असून एका अमेरिकन कंपनीने त्यात रस दाखवल्याचे देखील डीएसके यांच्याकडून सांगण्यात येतंय . डीएसके पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात हजार झाले होते, तेव्हा… Read More »

पुण्यात वाघोली परिसरात एटीएम फोडण्याचा होता प्लॅन .. पण ?

वाघोली येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडत असताना लोणीकंद पोलिसांनी रविवारी पहाटे दोन जणांना रंगेहाथ पकडले मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला . ही घटना वाघेालीतील साईसत्यम पार्क परिसरात घडली.ऋषी चंद्रेश्वर शर्मा (वय 29), गणेश निश्चींद्र ठाकुर (वय 20) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. मात्र विजय रामचंद्र कदम (सर्व रा. लोहगाव ) हा फरार… Read More »