Tag Archives: nashikkar

तुकाराम मुंढेना उच्च न्यायालयाने फटकारलं, मागावी लागली बिनशर्त माफी : काय आहे प्रकरण ?

उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही कारवाई केल्याने नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बिनशर्त माफी मागावी लागली आहे. तुकाराम मुंढे यांनी गोदावरी तीरावरील बांधकामावर कारवाई केली होती, ज्यामुळे न्यायालयाने त्यांना फटकारत स्थगिती असतानाही कारवाई का केली ? अशी विचारणा केली. सोबतच हे बांधकाम महापालिकेच्या खर्चातून पुन्हा आधीप्रमाणे उभे करून देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. उच्च… Read More »

आसाराम बापूचा महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ ठिकाणचा आश्रम तुकाराम मुंढे यांनी केला जमीनदोस्त

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला आसाराम बापूचा नाशिक येथील गोदावरी नदीपात्रात गेले वीस वर्षे आश्रम होता. तिथले आसाराम बापूच्या नावाने भक्तांचे सगळे उपक्रम बिनदिक्कत सुरु होते. अनेक वेळा तक्रारी झाल्या मात्र कायदा वेळोवेळी कुचकामीच ठरला. दरम्यान या कालावधीत महापालिकेचे नऊ आयुक्त आले अन्‌ गेले मात्र आसाराम आश्रमाची वीटदेखील हलली नाही. मात्र, तुकाराम मुंढे यांनी आयुक्त… Read More »

नाशिकच्या तिबेटीयन मार्केटमध्ये स्फोट : मात्र अजूनही स्फोटाचे गूढ कायम

नाशिक शहरातील शरणपूर भागात महापालिकेच्या तिबेटीयन मार्केटमध्ये शनिवारी सकाळी 5 वाजण्याच्या एक मोठा स्फोट झाला. प्रथमदर्शनी हा स्फोट अवैधरित्या गॅस भरण्यासाठी केलेल्या सिलिंडरच्या गळतीमुळे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ज्या गाळ्यात हा स्फोट झाला तिथे हा सिलिंडर आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे . गाळ्याचा मालक हा सिन्नर येथे राहणारा असून आजूबाजूच्या लोकांनी व कामगारांनी सर्वप्रथम… Read More »

भद्रकाली पोलीस आणि कापड व्यावसायिक यांच्यातील रंगलेल्या वादाची कथा

नाशिक शहराला पार्किंग ची अडचण हा प्रश्न काही नवीन नाही . स्थानिक तसेच बाहेरून आलेले लोक आडव्या तिडव्या गाड्या लावून त्यात अधिक भर टाकत असतात . मेन रोडवर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस व कापड व्यावसायिकांमध्ये चांगलाच वाद रंगला . शेवटी पोलिसांना काही कारवाई न करताच परत फिरावे लागले . शालिमार, मेन रोड… Read More »

इगतपुरी येथे रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, उच्चभ्रू घरातील नऊ तरुणांसह काही तरुणी रंगेहाथ धरल्या

इगतपुरी: मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं आहे. मुंबई – आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नामक पंचतारांकित हॉटेलात पोलिसांना छापा टाकून ही कारवाई केली. इगतपुरी पोलिसांनी नऊ तरुण आणि काही तरुणींना ताब्यात घेतले आहे. रेव्ह पार्टी सुरु असून… Read More »

विवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

विवाहास नकार दिला म्हणून रागातून नाशिक येथील तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ पळसे येथील… Read More »

बसफेऱ्या फेऱ्या कमी केल्यामुळे छेडछाडी चे प्रकार वाढले : राष्ट्रवादीची निदर्शने

नाशिक : एसटी महामंडळाने वाढत्या तोटय़ाचे कारण देत नाशिकच्या शहरी भागातील बसफेऱ्या कमी केल्या. शहरात २७४ बसफेऱ्यांपैकी केवळ १२९ फेऱ्या सुरू असून १४५ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.अचानक फेऱ्या कमी केल्यामुळे एकाचवेळी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांची गर्दी लक्षणीय वाढली आहे. ह्या परिस्थिती मुले टारगट टोळक्यांकडून विद्याथिर्नींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिला व विद्यार्थ्यांसाठी… Read More »