Tag Archives: narayan rane

उद्धवने तोंड बंद न केल्यास ‘ त्या ‘ सगळ्या घटना मी उघड्या केल्याशिवाय राहणार नाही: नारायण राणे

मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांना त्रास दिला होता .. जर त्यांनी तोंड बंद केलं नाही, तर उद्धवने घरात बाळासाहेबांना काय त्रास दिला, याची सगळी गुपिते भविष्यात उघडकीस आणणार अशी धमकीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. नारायण राणे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.… Read More »

नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी : राणे यांच्यावर हल्लाबोल

स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच असून नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोणतेही भवितव्य नाही. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, गेली २५ वर्षे नारायण राणे यांना मी ओळखतो. त्यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील… Read More »

मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

महाराष्ट्रात एकत्र सत्तेत असले तरी शिवसेना आणि भाजप मधील धुसफूस रोज चालू आहे. एके काळी कट्टर मित्र असलेले, शिवसेना भाजप यांचा आज एक दिवस सुद्धा एकमेकांवर टीका केल्याशिवाय जात नाही . दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरेंकडून सत्ता सोडण्याची भाषाही अनेकदा झाली आहे. मात्र सरतेशेवटी दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेतच. शिवसेनेला त्रास… Read More »

दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल : काँग्रेसला भोपळा आणि मनसेला एक

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर झाले असून, समर्थ विकास पॅनेल नावाखाली प्रथमच निवडणूक लढणाऱ्या ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनेलचे सर्वाधिक सरपंच निवडून आलेत. राणेंकडे १५६, शिवसेनेकडे ८४ तर ५१ भाजपकडे ग्राम पंचायती आल्याचा दावा करण्यात आलाय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थ विकास पॅनेल एक… Read More »

नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून..राणे यांच्यावर हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उत्पतीच मुळात गुंडगिरीतून झाली आहे. राणे यांच्या विरोधात चौकशी चालू आहे, त्या चौकशीला घाबरूनच त्यांनी पक्ष काढून भाजप सोबत जाण्याच्या निर्णय घेतलाय . असा आरोप राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात केला आहे . माझ्या कुटुंबावर आजवर एकही साधी तक्रार नाही. मात्र राणे यांच्यावर अनेक… Read More »

नारायण राणे व सरकारवर ‘ ह्या ‘ जनहित याचिकेद्वारा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नुकताच स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे मात्र राणे व अविघ्न ग्रुपचा मालक कैलाश अगरवाल यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगअंतर्गत सुरू केलेला तपास थांबवा, असा आदेश केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिल्याचा आरोप एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. मात्र हा तपास पुन्हा सुरू करण्यात यावा व ईडीकडून… Read More »

नारायण राणे भाजपमध्ये न जाता घेऊ शकतात ‘ हा ‘ मोठा निर्णय

नारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली असली तरी त्या भेटीतून राणे यांनी काही ठोस निर्णय घ्यावा इथपर्यंत चर्चा झाली नाही. घटस्थापनेला काँग्रेस सोडल्यानंतर राणे काय निर्णय घेणार,याकडे बऱ्याच राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राणे भाजप मध्ये न जाता आपल्या नव्या पक्षाची घोषणा १ ऑक्टोबरला करू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे . 1 ऑक्टोबरला… Read More »

सेनेला पोस्टरबाजी भोवली : पोलीस काय कारवाई करणार यावर लक्ष ?

नारायण राणेंविरोधात पोस्टर लावल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंविरोधात वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.नारायण राणेंचा संभाव्य भाजप प्रवेश शिवसेनेला पचनी पडेना झालाय . शिवसेनेकडून वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे. वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं.… Read More »

नारायण राणेंविरोधात अश्लील पोस्टर लावणारा हाच का महाराजांचे नाव घेणारा पक्ष ?

नारायण राणे यांनी शिवसेना सोडून बरीच वर्षे झाली असलॆ तर शिवसेनेचा राणे यांच्यावरील राग शांत झालेला नाहीये. नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत, आता इथेही शिवसेनेला नारायण राणेंची ही भूमिका काही पसंत पडलेली नाही. कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असून आपण त्यात लुडबुड करू नये हे मान्य… Read More »

मुलांचे उद्योग नीट चालावेत म्हणून राणे भाजप मध्ये : ‘ यांनी ‘ केला थेट आरोप

नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश मागील ७ ते ८ महिन्यांपासून निश्चित झाला आहे. त्यामुळे कालच्या घोषणेत नावीन्य काहीच नाही. मुलांचे राजकीय भवितव्य आणि उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालवावेत म्हणून राणे सत्ताधारी भाजपात जात आहेत. त्यांना सिंधुदुर्गातील कार्यकर्ते व विकासाचे काही एक देणे घेणे नाही असे आमदार वैभव नाईक म्हणाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत… Read More »