Tag Archives: mumbaikar

‘ ह्या ‘ कारणावरून ६५ वर्षीय आजींनी ७५ वर्षीय आजोबांचा केला खून : महाराष्ट्रातील घटना

संशयाचे भूत एकदा मानत शिरले तर काही केल्या जात नाही . मात्र त्याचा शेवट कधी कधी अत्यंत दुर्दैवी होतो . असाच एक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे . मुंबईतील चेंबूरमधील झोपडपट्टीत राहणा-या 65 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या 75 वर्षीय पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला आपल्या पतीचे दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता.… Read More »

तब्बल २२५ ठिकाणी मुंबईमध्ये तुंबणार आहे पाणी : ‘ ही ‘ आहेत ठिकाणे

महापालिकेच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणानुसार मुंबईतील २२५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. यापैकी ६० ठिकाणे दरवर्षी हमखास पाण्याखाली जातात. मात्र, मुंबईत सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. मेट्रो रेल्वे आणि विविध नागरी कामांसाठी सुरू असलेल्या अशा १७ ठिकाणांची यादी महापालिकेने तयार केली असून, तिथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुंबईत दरवर्षी अनेक… Read More »

भाजपच्या स्थापनादिनाचे कौतुक तुम्हाला,आम्हाला का त्रास : मुंबईकर भाजपवर चिडले

स्थापनादिनाचे औचित्य साधून बीकेसी मैदानावर आयोजित मेळाव्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमुळे काल महामार्ग जॅम झाले. मोठय़ा संख्येने वाहनांमधून मुंबईच्या दिशेने येणाऱया भाजपावाल्यांच्या वाहनांमुळे काळ सायंकाळी महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. कामावरून घरी परतणारे मुंबईकर अनेक तास त्या कोंडीत फसल्याने अक्षरश: हैराण झाले.आज देखील अशीच परिस्थिती असून मुंबईकर भाजपच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. ६… Read More »

‘ ह्या ‘ मनसे कार्यकर्त्याचे वेळीच ऐकले असते तर मुंबई आग टाळता आली असती

लोअर परेलमधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पब जळून खाक झालं. मात्र तब्बल १५ नागरिकांना देखील आपले प्राण यात गमवावे लागले. ह्या बिल्डिंगमध्ये आग लागू नये मम्हणून असलेल्या नियमाचे पालन केले जात नाही, त्यावर कारवाई करावी अशी तक्रार स्थानिक मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी केली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी… Read More »

सरकार हात धुवून दाऊदच्या मागे : इनकमिंग आऊटगोईंग केले बंद

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला अटक केल्यानंतर एकामागून एक दाऊद आणि त्यांचे धंदे यावर सरकार हातोडा चालवत आहे . त्यामुळे दाऊदवरची संक्रांत काही हटेना . दाऊद, त्याचा भाऊ इकबाल कासकर,छोटा शकील आणि अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसूल करण्यासाठी केलेले आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक असल्याचे भासवणाऱ्या भिवंडी येथील बोगस टेलिफोन एक्सचेंज वर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री… Read More »

महागाईविरोधाच्या मोर्चात शिवसेनेने ‘ ह्या ‘ शब्दात गाठली अत्यंत हीन पातळी

मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली असून मुंबईत 12 ठिकाणी महागाईविरोधात मोर्चे काढण्यात आले . ज्या नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. शिवसेनेने मात्र भाजपा… Read More »