Tag Archives: marathi

मराठीवर प्रेम करता ना .. तर ‘ ही ‘ गुड न्यूज नक्की वाचा आणि शेअर करा

मराठीभाषेवर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक सुखद अशी बातमी आहे . राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील आता हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषाही आपल्या राज्यात बंधनकारक केली आहे. बँक, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, विमानतळ अशा विविध ठिकाणी मराठी भाषेचा वापर हा संबंधित विभागाला करावाच लागेल असे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने परिपत्रक काढले आहे. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये… Read More »

परत सांगू नका बोललो नव्हतो : मनसेचे पुढील टार्गेट ‘ हे ‘ आहे

मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे मध्ये मराठी पाटयांसाठी आक्रमक होत दुकानदारांना इशारावजा धमक्या दिलेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी कार्यकर्ते कामाला लागले. मात्र मनसेचे पाटयांसाठीचे आंदोलन पुढेही सुरु राहणार असून यापुढे आता मनसेच्या रडारवर आहेत बॅंका. सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकामध्ये मराठीचा वापर नगण्य आहे . पैसे भरण्यात येणाऱ्या स्लिप पासून तर चेक बुक पर्यंत… Read More »

‘ त्या ‘ वादग्रस्त व्हिडिओ बद्दल माधवी जुवेकर याचे अखेर स्पष्टीकरण

बेस्ट कर्मचा-यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता . ह्या व्हिडिओमध्ये बेस्ट अधिकारी ,मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर यांच्यावर नोटा उधळताना दिसत आहे.आक्षेपार्ह अशा ह्या व्हिडिओ मुळे माधवी जुवेकर ह्या नेटिझन्स च्या टीकेच्या शिकार झाल्या होत्या. दोन महिलांमधील अति जवळीक देखील बऱ्याच नेटिझन्स ला खटकली होती. मात्र अखेर… Read More »

शिवसेनेची गुजरात मधील भूमिका झाली स्पष्ट : ‘ यांना ‘ केला पाठिंबा जाहीर

महाराष्ट्रात भाजप बरोबर सत्ता उपभोगायची आणि भाजपवर टीका देखील करत राहायची .शिवसेनेची ही भूमिका आता हळू हळू आपल्या देखील अंगवळणी पडलीय आहे . हा शिवसेनेचा डबल रोल गुजरात मध्ये देखील सुरु असल्याचे समजते . भाजपविरोधात पाटीदार समाजाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना शिवसेना आपला पाठिंबा देणार आहे . कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी तिखट… Read More »

ते सहा नगरसेवक शिवसेनेत येण्याचे ‘ हे ‘ होते कारण : उद्धव ठाकरे यांनी सांगितले गुपित

शिवसेना , भाजप व मनसे ह्या तीन पक्षांमधली भांडाभांडी मुंबईमध्ये कायम चालूच असते . मनसेचे सहा नगरसेवक पळवल्यापासून मनसे शिवसेनेवर कडक शब्दात हल्ले करत असते तर हातातोंडाशी असलेला महापौर पदाचा घास शिवसेनेने पळवला म्हणून भाजप शिवसेनेवर खार खाऊन आहे. मात्र तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना अशी सध्या परिस्थिती आहे. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेत का… Read More »

नेते तुम्ही आहेत तरी कुठं ? मला कोणी घेईना .. हिंदुत्वाचे ढोंगी

एस.टी.चा संप झाला .. ३ रा दिवस संप सुरूच .. अहो नेते मी वाट बघतोय .. वाट पाहीन पण एस.टी. नीच जाईन .. कारण पैसे नाहीयेत हो माझ्याकडे.. निवडून आलेले लोक पण आजकाल पैशावर विकले जातात, कोणत्या पण गाडीत बसतात, पण मला कोण घेईना.. खाजगी गाडीत बसायचा विचार आला होता पण दुप्पट भाडे देण्याची ऐपत… Read More »

औरंगाबादच्या फटाका मार्केटची फायनल जागा ‘ ही ‘ आहे : अनुभवातून घेतला बोध

गेल्या वर्षी फटाका मार्केट मध्ये लागलेल्या आगीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ह्या वेळी सरकारी यंत्रणेने कंबर कसली आहे .. फटाका मार्केट लोकवस्तीपासून दूर ठेवण्याच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर नवीन जागेसाठी जोरदार हालचाली सुरु होत्या. आता आरटीओ विभागासमोरील अयोध्यानगर येथील मैदानावर फटका मार्केट भरवण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे . तसेच वाळूज भागासाठी रांजणगाव येथे फटाका मार्केट… Read More »

शिवप्रहार संघटनेने केली ‘ हा ‘ टोलनाका बंद करण्याची मागणी

नगर कोपरगाव रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणे भयानक कठीण झाले आहे. या मार्गावरील दोन्ही टोलनाके येत्या आठ दिवसात बंद करावेत,अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने टोलवसूली बंद केली जाईल असा इशारा शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी दिला . अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सार्वजनिक अभियंता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी.बी.भोसले… Read More »

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या फोटोमागच सत्य ‘ हे ‘ आहे

जर हा फोटो तुम्ही पहिला असेल तर यामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा नक्की झाली असेल . आंध्र प्रदेश मधील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत बाईकवर एक व्यक्ती दोन महिला आणि दोन मुलांसोबत बसली आहे. तर समोर एक पोलिस अधिकारी या बाईकस्वारासमोर अक्षरश हात जोडून उभा आहे . आंध्र प्रदेशातील… Read More »

‘ ह्या ‘ रुग्णालयात उंदीर पेशंटचा चावा घेतात : लागोपाठ २ घटना

महापालिकेच्या रुग्णालयांमधील सुधारणा होत नाही हेच खरे. मुंबई , कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी हाहाकार माजवला असून उपचारासाठी गेलेल्या दोन महिला रुग्णांचा चावा घेतला आहे. एकीच्या पायाला आणि दुसरीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघींवरही उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे ११ दिवसांच्या आत या दोन घटना घडल्या असून, पहिली घटना घडल्यानंतरही काहीच प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने… Read More »