Tag Archives: maharashtra news

प्रवाशांच्या गैरसोयीसाठी संपाला सुरुवात : खाजगी गाडयांना दमदाटी आणि एसटीवर दगडफेक

सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. ऐन दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारल्याने राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या… Read More »

रामदास आठवले यांचे ‘ हे ‘ वक्तव्य म्हणजे मनसेच्या जखमेवर मीठ

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत . त्या वादात आता रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे . मात्र आठवले यांनी दोन्ही भावांना वाद घालण्याऐवजी सामंजस्याने राहण्याचा सल्ला दिला आहे . राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या गालावर टाळी मारण्याऐवजी टाळी मारायचीच असेल तर हातावर टाळी मारावी असा सल्ला केंद्रीय… Read More »

बायकोसोबत लग्न करण्यासाठी पतीचा दबाव, एकाची आत्महत्या

एक विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना महाराष्ट्रात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी परिसरातील ही घटना आहे .इथला एक व्यक्ती आपल्या बायकोसोबत तू सतत बोलतोस त्यामुळे तू तिच्याशी लग्न कर असा दुसऱ्यावर दबाव टाकत होता . ह्या दबावाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते . आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव सुनील यादव (वय २३) असे… Read More »

कोल्हापुरात खळबळ उडवून देणाऱ्या दर्शन शहा खटल्याचा आला ‘ हा ‘ निकाल

कोल्हापुरातील गाजलेल्या व खळबळ उडवून देणाऱ्या दर्शन शहा या मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणी मंगळवारी न्यायालयाने आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबत त्याला १ लाख ५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. आरोपीला फाशी किंवा जन्मठेप व्हावी अशी अपेक्षा दर्शन शहा याची आजी आणि आईने व्यक्त केली होती. दर्शन शहा… Read More »

फक्त ‘ एवढ्या ‘ कारणावरून केला अल्पवयीन मुलीचा खून : पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक

आईच्या पोटात असल्यापासूनच मुलींचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरु होतो. कुठे केवळ मुलगी नको म्हणून गर्भपात करून मारून टाकले जाते तर कित्येक ठिकाणी स्त्री कुणाच्यातरी वासनेचा बळी ठरते . महाराष्ट्रात अल्पवयीन मुली कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत. पण याचाही कळस अशी एक घटना राजूर येथे घडली आहे . अनैतिक संबध पाहिल्याने तीन जणांनी अल्पवयीन मुलीचा खून करून मृतदेह… Read More »

कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली २ ठार १९ जखमी

कोल्हापुरातील मोहरमच्या ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने २ जण ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. बस चा ब्रेक अचानक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येते . रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला. कोल्हापुरातील पापाची तिकटी या ठिकाणाहून मिरवणूक जात होती त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली . संतप्त जमावाने केएमटीवर हल्ला चढवत… Read More »

बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वेची परिस्थिती सुधारा : चेंगराचेंगरीनंतर अजित पवार यांचे सरकारवर तोंडसुख

मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार वर संतापले असून एक लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा सध्याची रेल्वेची परिस्थिती सुधारा, अशा शब्दांत पवार यांनी सरकारला सुनावले आहे. रेल्वेसेवेची परिस्थिती भीषण असल्यामुळेच असे वारंवार अपघात होत आहेत. रेल्वे समस्या सोडवण्यासाठी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आग्रही होते,परंतु… Read More »

भगवान गडावर भाषण करण्याच्या पंकजा मुंडे यांच्या भावनिक सादेला मिळाला ‘हा ‘ रिप्लाय

मी भगवान गडाची लेक आहे. लेकीला दिवाळीची भेट म्हणून फक्त २० मिनिटे भगवान गडावर भाषण करण्याची परवानगी द्या, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना घातली होती . महंत यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते . मात्र नामदेव शास्त्री यांनी ही साद धुडकावून लावली आहे, त्यामुळे या वर्षीही पंकजा… Read More »

भाजपवाल्यांनो जे पेरल तेच उगवतय : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज भाजपवर टीकास्त्र सोडलंय. भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर उलटलंय असही राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी एक मोठी पोस्ट टाकली… Read More »

माथेरानच्या जंगलात डुप्लिकेट सर्पमित्रांची फुसफुस

वन्यजीवांच्या विविधतेसाठी माथेरान जंगल प्रसिद्ध आहे. साप, बेडूक आणि सरडय़ाच्या अनेक प्रजाती माथेरानाच्या जंगलात आढळतात ज्या इतरत्र आढळत नाहीत . हरणटोळ, ढोल मांजऱ्या, कोब्रा, नाग, पीट वायपर या सापांच्या प्रजाती या परिसरात सापडतात . वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कोणत्याही वन्यजीवांची तस्करी वा संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय त्यांना हाताळणे कायदेशीर गुन्हा आहे. असे बरेच स्वयंघोषित संशोधक… Read More »