Tag Archives: koregaon bhima

मनुस्मृतीचे समर्थन करत हिंदू समाजाच्या भावना मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी दुखावल्या : केले वादग्रस्त वक्तव्य

मनुनं जगाला पहिली घटना दिली. मनुस्मृती म्हणजे मानववंशास्त्र आहे. मनुच्या सावलीला उभं राहण्याचीही आपली लायकी नाही’, असं म्हणत श्री शिव प्रतिष्ठानच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीररीत्या समर्थन केले आहे. सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीपणा म्हणजे निव्वळ नालायकपणा आहे आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ थोतांड असल्याची जळजळीत टीका मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केली आहे. नंदुरबारमधील धर्मसभेत… Read More »

मी मनोहर कुलकर्णी नव्हे, तर संभाजी भिडेच : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी म्हणणे दाखल करताना माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथमच संभाजी भिडे यांच्या… Read More »

कोरेगाव भीमा प्रकरणातील साक्षीदार पूजा सकटचा संशयास्पद मृत्यू : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट या 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह राहत्या घराजवळ विहिरीत आढळून आहे आहे . दरम्यान ही घटना नसून घातपाताचा प्रकार असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे . दंगलीच्या वेळी पूजा सकट ही 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी साक्षीदार होती. आज तिचा मृतदेह घराबाहेरील विहिरीत आढळून आलाय. पूजा हिचा घातपात झाला… Read More »

मनोहर भिडे मोकाट मात्र महाराष्ट्रभर दलित नेत्यांच्या कार्यालय व घरांवर छापे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि दलित नेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, नागपूर आणि गडचिरोली परिसरात हे छापे टाकण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७… Read More »

संपूर्ण एकबोटे फॅमिलीला तोफांच्या तोंडावर द्या आणि एन्काऊंटर करा .. फॉर पीस पीस पीस पीस : पूर्ण बातमी

पुणे येथील समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा शांततेसाठी एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र एकबोटे यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. शिवाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांचे भाऊ डॉ. गजानन एकबोटे ह्या पत्राबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार… Read More »

भिडे समर्थकांची प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची मागणी : राज्यभर समर्थनार्थ मोर्चे

कोरेगाव भीमा च्या हिंसाचार प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी ठपका ठेवलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांचा दावा आहे… Read More »

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी एल्गार मोर्चा निघणारच : प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं आज मुंबईत एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, भारिपच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे, आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आझाद मैदानावर आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे. भारिप… Read More »

मिलिंद एकबोटे यांच्याबद्दल ‘ महत्वाची ‘ बातमी : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

कोरेगाव-भीमामधील हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने गुरूवारी (15 मार्च) रोजी हा निर्णय दिला. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याचा आरोप ठेवत बुधवारी (14 मार्च) मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेले समस्त… Read More »

‘ अशी ‘ झाली मिलिंद एकबोटे यांना अटक : आज करणार न्यायालयात हजर

काेरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या जातीय दंगलीत चिथावणी दिल्याचा आरोप असलेले समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शिवाजीनगर येथील घरातून बुधवारी दुपारी अटक केली. 1 जानेवारी रोजी शिरूर तालुक्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी आले होते. यादरम्यान त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. त्यातून पुढे दंगल उसळली… Read More »

कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासाठी मोठा धक्का देणारी बातमी

समस्त हिंदू एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला सून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आधी परिस्थिती आहे . अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.त्यांच्यावर दगडफेकीस प्रवृत्त करणे आणि लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे . शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे सुद्धा… Read More »