Tag Archives: kopardi case

चॅनेलवर बातम्या द्यायला आईसोबत लहान मुलगा आणि अँकर रडू लागली : काय आहे प्रकार ?

” मी आहे तुमची अँकर किरण नाज…तुम्ही पाहताय बुलेटिन 7 ते 8, पण आज मी अँकर नाही तर एक आई आहे…” असं म्हणत पाकिस्तानमधील समा वृत्तवाहिनीच्या एका महिला अँकरने एका चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा निषेध केलाय.तर दुसऱ्या एका चॅनेलवर ह्या घटनेचे वार्तांकन करत असताना आणिका निसार ह्या अँकरला रडू कोसळले, तिने लगेच ब्रेक घेतल्याचे सांगून… Read More »

कोपर्डीच्या दोषींबद्दल ‘ त्या ‘ निनावी फोनचे रहस्य उलगडले : हे होते कारण

कोपर्डी खटल्याचा निकाल लागल्यानंतर २९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जिल्हा कारागृह अधीक्षकांना एक फोन आला़ ‘मी मुख्यमंत्र्यांचा खासगी पीए बोलतोय’, असे सांगत तिन्ही आरोपींना फाशी झाली असून, त्यांना येरवडा कारागृहात पाठविण्याचे फर्मान सोडले. पुन्हा जरा वेळाने फोन करून ‘एसपी बोलतोय’ असे सांगत तोच निरोप दिला. रात्री आठ वाजता त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून ‘पोलीस महासंचालक… Read More »

छकुलीला अखेर न्याय मिळाला कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा : सविस्तर बातमी

कोपर्डी प्रकरणातील तिघाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ अशी ह्या नाराधमांची नावे आहेत. अवघ्या पाच मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. सोबतच , जितेंद्र बाबुलाल शिंदेनं (आरोप क्रमांक १)… Read More »

कोपर्डीतील तिघांनाही फाशीच्या शिक्षेची मागणी : काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्या तिघांनाही फाशीची शिक्षा मिळावी असा युक्तिवाद आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला.कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत. यातही त्यांनी अफजल गुरु व… Read More »

कोपर्डी प्रकरणातील दोषीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्त दै. लोकमत ने दिले आहे . आहेर यांनी युक्तिवाद करताना दोषीच्या कुटुंबाचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ही धमकी मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास देण्यात आल्याचे दै. लोकमत ने… Read More »

कोपर्डीचे नराधम न्यायालयात काय बोलले ? : कोपर्डी अपहरण व खून खटला

कोपर्डीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करून खून केला गेला होता .या नंतर सर्व मराठा समाज आरोपींच्या विरोधात रस्त्यावर एकवटला होता. मराठा मूक क्रांती मोर्चाची सुरवात होण्याचे हे एक मुख्य कारण ठरले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर आज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर बलात्कार… Read More »

अखेर कोपर्डी केसच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात : उज्ज्वल निकम मांडताहेत सरकारची बाजू

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज विशेष नगर जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरवात झाली. मागील वेळी आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करणारे ऍड. खोपडे हे वाघोली पुणे येथे झालेल्या ट्रॅफिक जाम मुळे कोर्टात वेळेवर पोहचू शकले नव्हते. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. पीडित मुलीचा… Read More »

‘ ह्या ‘ कारणामुळे नाही होऊ शकला कोपर्डी केसचा अंतिम युक्तिवाद

संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत . बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले . त्यामुळे ह्या खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली.त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन… Read More »