Tag Archives: karnatak election 2018 exit poll

कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी खेळलेला भाजपचा ‘ हा ‘ डाव देखील फसला : कर्नाटक बहुमत चाचणी

भाजपने कितीही आव आणला तरी कर्नाटकाचा डाव फसल्याचे दुःख खूप मोठे झाले आहे . असाच आणखी एक डाव भाजपने कर्नाटकमध्ये खेळाला होता मात्र तो देखील आता फसला आहे . कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला हा डाव देखील औटघटकेचा ठरला. बहुमत चाचणीआधी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार… Read More »

तर कुमारस्वामी देखील होऊ शकतील अडीच दिवसांचे मुख्यमंत्री : 12.15 ला होणार चित्र स्पष्ट

भाजपाविरोधी काँग्रेसशी आघाडी करून सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार असल्याने कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकतील, असे चित्र आहे.मात्र भाजपचे धुरंधर अजूनही काही चमत्काराच्या आशेवर आहेत . विधानसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास… Read More »

काँग्रेस जेडीएस मध्ये ‘ हा ‘ नवीन वाद उफाळला : कर्नाटक विधानसभा निवडणूक

जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.गुरुवारी शपथविधी असून अद्याप देखील कोणताच निर्णय झालेला नाही. जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं… Read More »

‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम

सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »

‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी

कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »

पीपीपी काय ? ‘ अशी ‘ पेटून उठली कॉंग्रेस : अपक्षांचा पण भाजपला ठेंगा

कर्नाटकच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था ‘पीपीपी’ म्हणजे ‘पंजाब, पुडुचेरी आणि परिवार’ अशी होईल, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तवले होते. कर्नाटकच्या निकालानंतर त्यांची भविष्यवाणी वास्तवाच्या जवळ पोहोचली होती आणि ही खरी करून पाहण्याच्या नादात मोदी-शहांच्या सहकाऱ्यांनी खेळलेला सत्तेचा जुगार सरतेशेवटी भाजपच्या अंगलट आला. एक वर्षावर आलेली लोकसभेची निवडणूक त्यापेक्षा देखील आधी होण्याची शक्यता असताना… Read More »

छप्पन्नचं काय, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही : ‘ ह्या ‘ अभिनेत्याकडून मोदींची खिल्ली

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More »

कर्नाटक राजीनामा नाट्यावर शिवसेनेने दिली ‘ जळजळीत ‘ झोंबणारी प्रतिक्रिया

बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं काल संध्याकाळी… Read More »

कुमार स्वामीच होणार सी.एम. मात्र गुगलवर कुमारस्वामींची पत्नी ट्रेडिंगमध्ये : काय कारण ?

कर्नाटक निवडणुकीत जनता दल (सेक्युलर)चे नेते एचडी कुमारस्वामी किंगमेकर बनतील अशी चर्चा होती पण निकालानंतर तेच कर्नाटकचे किंग बनले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडून येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत नसल्याने त्य़ांनी पदाचा राजीनामा दिला. आता राज्यात काँग्रेस आणि जेडीएसची सरकार बनणार आहे. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे.… Read More »

पराभूत भाजपने जाता जाता केले ‘ हे ‘ नीच काम : नेटिझन्सकडून चौफेर टीका

कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री येडियुरप्पांनी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच ते सभागृहातून बाहेर पडले. गंभीर बाब म्हणजे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोपय्या तसेच भाजपचे सर्व आमदारही त्यांच्या मागोमाग सभागृह सोडून निघून गेले. भाजपकडून अशाप्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करण्यात आल्याने त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबरदस्त हल्लाबोल केले आहे.… Read More »