Tag Archives: indian news

चक्क बदला म्हणून तो सापाला चावला पण … : पुढे काय झाले ?

आजपर्यंत आपण साप माणसाला चावला असे अनेक किस्से ऐकले असतील मात्र ही बातमी याच्या उलट आहे .इथे सापाने दंश केला असा संशय एका माणसाला आला होता. त्याचा बदल म्हणून माणूसाने साप धरला व त्याचा चावा घेतला . मात्र ह्या चाव्यानंतर त्याला चक्कर आली आणि दवाखान्यामध्ये दाखल करावे लागले. उत्तर प्रदेश मधील हरदोई इथे ही आगळी… Read More »

रामदेव बाबांना भेटणं ही एक चूकच होती :प्रणव मुखर्जी

वर्ष २०११ मध्ये यूपीए २ च्या कार्यकाळात रामदेव बाबा आंदोलन करणार होते मात्र त्याआधी विमानतळावर जाऊन त्यांची भेट घेणे आपली चूक होती, अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात दिली. यूपीए २ च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. रामदेव बाबा आंदोलन करणार म्हटल्यामुळे,प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे… Read More »

मोदींची हुकूमशहा किम जोंग ऊनशी तुलना करणारे ‘ हे ‘ वादग्रस्त पोस्टर व्यापाऱ्यांना भोवले

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत अन भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र एखाद्याबद्दल एकदम खालच्या पातळीमध्ये होर्डिंग लावणे किंवा त्यावर आक्षेपार्ह मजकूर टाकणे हे देखील तितकेच निंदनीय आहे. देशाचे प्रधानमंत्री मोदी यांच्याबद्दल हा दुर्दैवी प्रकार घडला आहे . एका बाजूला दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून करोडो व्यापाऱ्यांचा रोष पत्करून जी.सी.टी. आणला खरा पण कागदी फेर फार करून… Read More »

गुरमीत बाबा आणि हनिप्रीतच्या पापांचा पर्दाफाश करणारी ‘ ही ‘ वस्तू पोलिसांच्या ताब्यात

बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची जिल्हा न्यायालयाकडून सुखदीप कौर सोबतच 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे . हनीप्रीत पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे देखील समोर आलेले आहे . यापुढे हनीप्रीत आणि सुखदीप अंबाला कारागृहात बंद असणार आहे. हनीप्रीतकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना कोणताही लॅपटॉप… Read More »

देशभरात गाजलेल्या आरुषी हत्याकांडावर अखेर न्यायालयाचा ‘ हा ‘ आला निर्णय

आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.मात्र आज आरुषी हत्याकांड प्रकारामध्ये अलाहाबाद हाय कोर्टाने आज आपला निर्णय देत डॉक्टर राजेश आणि नुपूर तलवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तलवार… Read More »

रेल्वे अधिकाऱ्यांची ३६ वर्षे जुनी सरंजामी बाबूगिरी होणार बंद : मंत्रालयाने दिला ‘ हा ‘ स्पष्ट आदेश

आम आदमी जीव मुठीत धरून प्रवास करत असताना रेल्वे अधिकाऱ्यांची बाबूगिरी यापुढे चालणार नाही . रेल्वेची ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिका-यांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी पद्धत मोडीस काढण्याचे सांगण्यात आले आहे . रेल्वेच्या ३६ वर्षे जुन्या ‘प्रोटोकॉल’नुसार रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भेटीच्या… Read More »

जीएसटी मध्ये होऊ शकतात ‘ हे ‘महत्वाचे बदल : मार्केट उठाव घेणार का ?

जीएसटी अजूनही लोकांना ठीकठाक कळलेला नाही ..त्यामुळे व्यवहार होण्यास अडचणी येत असून पैशाचा फ्लो बंद असल्या कारणाने मार्केट थंड आहे . मात्र आता जीएसटी मध्ये महत्त्वपूर्ण आणि मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत.  जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो . बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटीसाठी नेमण्यात आलेल्या मंत्रीगटाचे सदस्य सुशील मोदी यांनी तसे संकेत दिले… Read More »

धक्कादायक: ३० वर्षे आर्मीत काम केल्यावर नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ

आयुष्याची तब्बल ३० वर्षे देशासाठी खर्च करून सेवानिवृत्त झालेल्या एक माजी सैनिकाला भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लढावे लागते आहे . आसाम पोलिसांनी ह्या सैनिकांवर एफ.आय.आर. नोंदवून आपण बांगलादेशी घुसखोर नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी टाकली आहे . ह्या धक्कादायक घटनेवर समाजाच्या सर्वच थरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . मोहम्मद अजमल हक असे ह्या… Read More »