Tag Archives: bjp

न्यायदेवतेचे तरी ऐका : केंद्राच्या हुकूमशाहीवर शिवसेनेचा ‘सामना ‘ तून हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं दिल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार न्यायदेवतेचं तरी ऐकणार का?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला विचारला आहे. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारच्या बाजूनं निकाल दिला. दिल्लीत केजरीवाल आणि जनता ह्यांचीच सत्ता असून मोदी सरकारने त्यांची अडवणूक… Read More »

#ब्रेकिंग: जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढला : सरकार अल्पमतात काय आहे परिस्थिती ?

महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. जम्मू-कश्मीर बीजेपीचे प्रभारी राम माधव यांनी प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये घोषणा केली मात्र कारण देताना त्यांनी काश्मीर खोऱ्यात प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आहे असे कारण सांगितले आहे .भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महबुबा मुफ्ती यांच्या… Read More »

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट ? : काय आहे पूर्ण बातमी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची भरसभेत ज्यापद्धतीने हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची देखील हत्या करण्याचा दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्याचं नक्षलवाद्यांकडे सापडलेल्या एका पत्रातून स्पष्ट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नक्षली कनेक्शन असल्याच्या आरोपावरून… Read More »

अमित शहांच्या स्वागताची ‘ अशी ‘ तयारी मातोश्रीवर आहे सुरु

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या भेटीबद्दल अद्याप दोन्ही पक्षांकडून जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून या भेटीबाबत अनिश्चितता बाळगत चर्चेत राहण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे . पोटनिवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपाला आता मित्रपक्षांची गरज भासू लागली असून त्यांचे महत्व पटू… Read More »

तोंड काळं करुन जोड्याने मारेन, भाजपा नेत्याची सरकारी कर्मचाऱ्याला धमकी

भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतानाच आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते जगन्नाथ सिंह रघुवंशी यांनी राज्य विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. याचा व्हिडिओ सध्य सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रघुवंशी सरकारी कर्मचाऱ्याला तोंड काळे करण्याची धमकी देताना दिसत आहेत. “तुम्ही माझ्या दयेवर… Read More »

लोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न

भाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत केले ‘ हे ‘ विधान : केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह

एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. भाजप सरकारला मस्ती आली आहे असे सर्वसाधारण जनतेचे मत असून त्यात अशा विधानांनी आणखीन भर पडत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला बोगस म्हटले जात आहे. बिहारमधील पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह… Read More »

पालघरच्या पराभवाबद्दल शिवसेनेचे काय आहे म्हणणे ? : सामनातून भावना व्यक्त

आमच्यासाठी निकाल म्हणजे २०१९ चा आमच्या मोठ्या विजयाची सुरुवात आहे असे शिवसेनेने म्हटले आहे . आजच्या संपादकीय मधून भाजप, निवडणूक अयोग्य आणि पोलीस यंत्रणा यांच्यावर देखील शिवसेनने टीका केली असून विजयी मिरवणूक काढायचीच असेल ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा व ‘ईव्हीएम’ची काढा! आम्ही ताकदीने व स्वाभिमानाने लढलो आणि शिवसेना समाधानी आहे. अशा शब्दात भाजपच्या विजयावर… Read More »

योगी आदित्यनाथ याचे चपलेने थोबाड फोडले पाहिजे :का म्हणाले उद्धव ठाकरे पहा व्हिडिओ ?

सत्तेत आल्यापासून भाजपचा अहंकार वाढला असून भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला देखील आता भाजपचा अहंकार मोठ्या प्रमाणात खटकू लागलेला आहे . पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले . त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नालासोपाऱ्यात सभा घेतली होती… Read More »

२०१९ साठी ‘ हा ‘ आहे भाजपचा नारा ? : भाजपने केली सुरु प्रचाराची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मधील लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. या निवडणुकीत भाजपाचा नारा काय असणार, याची सर्वांनाच उत्सकुता होती. ‘२०१९ मे फिर एक बार, मोदी सरकार’ हा नारा घेऊन भाजपा प्रचारात उतरणार असून शनिवारी मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी… Read More »