Tag Archives: संजय निरुपम

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काहीवेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण… Read More »

फेरीवाला विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘ मोठा ‘ निर्णय

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळीच ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन केले होते . मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला होता. मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या… Read More »

मनसेच्या गुंडगिरीपुढे झुकणार नाही, देणार जशास तसे उत्तर : फेरीवाले आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेरिवाला हटाव मोहिमेच्या विरोधात आता फेरीवाले देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे . याआधी देखील फेरीवाल्यानी मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना गाठून मारहाण केली होती. डोक्यात रॉड ने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे मात्र आक्रमक असून, यापुढे फेरीवाले विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत… Read More »

चौथ्यांदा सत्ता मिळाली तरी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोंड बंद करून गप्प का ? : शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसेने उभारलेल्या आक्रमक आंदोलनाला मुंबई काँग्रेसचा विरोध आहेच मात्र तरी मुंबईकरांना विकासाची स्वप्ने दाखवत पालिकेत सत्ता उपभोगणारी शिवसेना व भाजप मात्र अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्पच आहेत. शिवसेना फेरीवाल्याच्या विरोधात कुठेही आक्रमक नाहीये, मात्र भाजपच्या विरोधातच पत्रके काढून वाटण्यात मग्न असल्याचे सध्या… Read More »

काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मोर्चा सुपरफ्लॉप : मराठी माणसाशी टक्कर निरूपम यांना नडली

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर मुंबई येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ ‘फेरीवाला सन्मान’ मोर्चा आयोजित केला होता.मात्र आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या वर्सोवा लोखंडवाला सर्कलजवळील ब्रेव्हरली हिल्स अपार्टमेंटबाहेर थांबले होते . बाहेर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी पाहता संजय निरूपम यांना घराबाहेरच पडण्याची संधी मनसे कार्यकर्त्यांनी दिली नसल्याचा दावा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे… Read More »

पोलीस परवानगीला ठेंगा दाखवत मुंबईत फेरीवाले आक्रमक : उचलले ‘ हे ‘ पाऊल

मुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये काही अघटित होऊ शकते ह्या करणाऱ्याने पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा होणारच ह्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे . हा मोर्चा संजय निरुपम… Read More »

अखेर मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्या हल्लेखोरास मनसे कार्यकर्त्यांनी धरले

अखेर मुंबईतील मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन व्यक्तींना मनसे कार्यकर्त्यांनी पकडले. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. लोखंडी रॉडने डोक्यात मारल्यामुळे सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. माळवदे यांच्यावर हल्ला करणारे हे दोन हल्लेखोर सध्या पोलिसांच्या… Read More »

अधिकृत आणि अनधिकृत ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेचे फालतू कार्यकर्ते यांना नाही

कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. ह्या गोष्टीचा राग ते गोरगरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत अशा शब्दात राज ठाकरे यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज ठाकरे व मनसेला फटकारले आहे . शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत… Read More »