Tag Archives: शिवसेना

केडगावच्या ‘ त्या ‘ बैठकीचे रहस्य कायम राहण्याची शक्यता : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडाच्या पार्शवभूमीवर झालेल्या बैठकीचे रहस्य हे बहुदा रहस्यच राहण्याची शक्यता आहे कारण यातला आरोपी भानुदास कोतकर याची नीट चौकशी होण्याआधीच न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे. कोतकर पोलीस कोठडी संपल्याने त्याला जिल्या न्यायालयात हजर करण्यात आले होते . कोतकर याला विशेष पोलीस पथकाने सापळा रचून पुणे येथून १४ मे रोजी अटक केलेली होती. न्यायालयाने त्याला… Read More »

छप्पन्नचं काय, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही : ‘ ह्या ‘ अभिनेत्याकडून मोदींची खिल्ली

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Read More »

कर्नाटक राजीनामा नाट्यावर शिवसेनेने दिली ‘ जळजळीत ‘ झोंबणारी प्रतिक्रिया

बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यानंतर भाजपावर टीका करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा हिटलरशाही आणि अहंकाराचा अंत होण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं काल संध्याकाळी… Read More »

शिवसेनेच्या कर्नाटकमधील ३७ उमेदवारांचे काय झाले ? : घ्या जाणून

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप पहिला, काँग्रेस दुसरा तर जेडीएस तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. पण या तीन पक्षांशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अन्य राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे बहुतांश पानिपत झाले आहे . शिवसेनेने देखील आपले तब्बल ३७ उमेदवार उभे केले होते . कर्नाटकात आपलं नशीब आजमावू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, बिहारमधल्या जेडीयू आणि दिल्लीतील आप… Read More »

अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवल्याने मयताच्या कुटुंबियांचे उपोषण मागे : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव (अहमदनगर ) येथील दोघा शिवसैनिकांच्या हत्येच्या तपासाबाबत तक्रारी करत मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी शनिवारपासून सुरु केलेले उपोषण मंगळवारी तब्बल ४ दिवसांनी मागे घेतले आहे. मात्र उपोषणमागे घेतेवेळी देखील त्यांची प्रकृती खालावलेली होती. हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातून अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना हटवण्यात आले असून , त्यांचा जागी… Read More »

भानुदास कोतकर याला दुर्धर रोग ..पोलिसांनी ठोकले कलम ३०३ :नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव इथे दोन शिवसैनिकांची हत्या करणारा आरोपी संदीप गुंजाळ हा हत्याकांडापूर्वी काही दिवस आधी भानुदास कोतकर याला भेटला होता, अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे .केडगाव हत्याकांड प्रकरणात विशेष पोलीस पथकाने सोमवारी कोतकर याला पुणे येथून अटक केलेली आहे . मंगळवारी त्याला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने त्याला १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश… Read More »

नगरच्या जनतेचा पोलिसांवर अजिबात विश्वासच उरलेला नाही कारण ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

केडगाव हत्याकांडप्रकरणी प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या लोकांनी समोर यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले असले आणि तब्बल १ लाखाचे बक्षीस जरी जाहीर केले असले , नाव गुप्त ठेवण्याची हमी दिली असली तरी अद्याप एकही नगरकर पुढे आला नाही. ही काँग्रेसचा स्थानिक गुंड भानुदास कोतकर ( सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून उपचाराचे निमित्त करून बाहेर आला आणि… Read More »

काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर ताब्यात ..आतातरी पोलीस सत्य शोधणार का ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

अहमदनगर येथील केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. कामरगाव हे जिथे हत्या झाली तिथून फक्त १२ किमी दूर आहे . विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.आता तरी… Read More »

नगर पोलिसांच्या हाती आणखी ‘ एक ‘ यश : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नगरजवळील केडगाव इथे शनिवारी ( ता. ७ ) भरचौकात शिवसेनेचे उप शहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या संदीप गुंजाळ उर्फ डोळसे याला गावठी कट्टे पुरवणाऱ्या आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आले असून त्याला नगरजवळील निमगाव वाघ इथून धरण्यात आले. बाबासाहेब केदार (वय ३८… Read More »

तीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही ? :सामनामधून सरकारवर टीकास्त्र

आजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते ? असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »