Tag Archives: राज ठाकरे

राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून माफ करण्याची विनंती करणार : राज ठाकरे

६ नगरसेवक शिवसेनेने पळवले, सर्वच निवडणुकीमध्ये म्हणावे असे कोणतेही यश पदरात पडले नाही. जवळचे बहुतांश सवंगडी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेले. मात्र अजूनही मनसेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्या विचारांमधील नकारात्मकता आहे तशीच आहे . कायम वादग्रस्त व द्वेषपूर्ण अशा भाषणांमध्ये आता आणखी एका वाक्याची भार पडली आहे , ती म्हणजे राष्ट्रपतींची भेट घेऊन एक खून… Read More »

जमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी ? : नाशिकमध्ये संवाद

मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून मनसेला जो धक्का बसला त्यातून मनसे सावरण्याचा प्रयन्त करत आहे . अत्यंत अनपेक्षित अशा ह्या फुटीमुळे किंगमेकर राहण्याची संधी मनसेने गमावली तर भाजपाला देखील मुंबईतून स्वतःचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावले. मनसेच्या नेतृत्वाबद्दल कायम सगळ्यांची तक्रार म्हणजे राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत , त्यांना कार्यकर्त्यांना समजावून घ्यायला वेळ नाही… Read More »

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

मुंबईत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा पॅटर्न मनसेने आता पुण्यात देखील राबवायला सुरु केले आहे .सध्या मनसे हा पक्ष अस्तित्वासाठी लढत आहे . मुंबईमध्ये मनसे च्या फेरीवाल्यांच्या आंदोलनाला जनतेतून बऱ्यापैकी पाठिंबा मिळाला. हाच पॅटर्न जिथे जिथे मनसेची थोडीबहुत ताकत आहे तिथे मनसेकडून राबवायचा प्रयत्न होत आहे . पुणे शहरात गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड, म्हात्रे पूल… Read More »

चौथ्यांदा सत्ता मिळाली तरी फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोंड बंद करून गप्प का ? : शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मनसेने उभारलेल्या आक्रमक आंदोलनाला मुंबई काँग्रेसचा विरोध आहेच मात्र तरी मुंबईकरांना विकासाची स्वप्ने दाखवत पालिकेत सत्ता उपभोगणारी शिवसेना व भाजप मात्र अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मूग गिळून गप्पच आहेत. शिवसेना फेरीवाल्याच्या विरोधात कुठेही आक्रमक नाहीये, मात्र भाजपच्या विरोधातच पत्रके काढून वाटण्यात मग्न असल्याचे सध्या… Read More »

काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मोर्चा सुपरफ्लॉप : मराठी माणसाशी टक्कर निरूपम यांना नडली

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर मुंबई येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ ‘फेरीवाला सन्मान’ मोर्चा आयोजित केला होता.मात्र आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्या वर्सोवा लोखंडवाला सर्कलजवळील ब्रेव्हरली हिल्स अपार्टमेंटबाहेर थांबले होते . बाहेर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी पाहता संजय निरूपम यांना घराबाहेरच पडण्याची संधी मनसे कार्यकर्त्यांनी दिली नसल्याचा दावा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे… Read More »

फेरीवाल्यांची मराठी माणसाला मारहाण अजिबात खपवून घेणार नाही : नितेश राणे

मुंबईच्या फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो आणि त्यांचे घर चालते म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे . सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी म्हणून त्यांनी त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकलेला आहे. अशा शब्दात काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांना फटकारले आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात… Read More »

हप्तेखोरीच्या रॅकेटमुळे फेरीवाल्यांना परवाने नाहीत. मनसेचा सहभाग असल्याचा आरोप

फेरीवाल्यांकडून मनसेचे मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा निषेधार्ह आहेच मात्र दुर्दैवाने ठोस तोडगा काही काढण्यापॆक्षा ह्या विषयावर राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल असेच प्रयन्त असल्याचे, एकंदरीत आरोप प्रत्यारोप पाहता वाटत आहे. फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करणाऱ्या रॅकेटमध्ये मनसेचे नेतेही सहभागी असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. मनसेने मुंबईतील… Read More »

मराठी माणसाला फेरीवाल्यानं मारणं कदापि सहन करणार नाही : काँग्रेसचे ‘ हे ‘ आमदार

मालाड पश्चिमेचे मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. आता याचे प्रत्युत्तर देनायची मनसेची भाषा आहे. मात्र आता मनसेच्या या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची साथ मिळाली आहे. काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे हेसुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. एका मराठी माणसाला फेरीवाल्यानं… Read More »

यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच :भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

यूपीवाले आणि राज ठाकरे यांचा डीएनए एकच असल्याची टीका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे बोलताना केली. राज ठाकरे म्हणतात की, यूपीवाला आला आणि त्यांनी मुंबईतील मराठी टॅक्सीवाल्याचा धंदा खाऊन टाकला. एके दिवशी मला ठाकरे यांचा केस सापडला. तो हैद्राबाद येथील डीएनए तपासासाठी पाठिवाला असता यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा व राज ठाकरे यांचा डीएनए एकच असल्याचे… Read More »

फेरीवाले देखील पेटले : मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना जबर मारहाण

मुंबईतील मालाड पश्चिम मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता आहे. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला असल्याचे बोलले जातंय.. मालाड रेल्वे स्थानकानजीक आज दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून खासगी रुग्णालयात… Read More »