Tag Archives: महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारकीला मारली ठोकर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नाही

राज्यात माणसे मरू लागली आहेत.अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही. माझ्या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी लोकांना जीव दयावा लागतो, त्यामुळे मला विधानसभेत जाण्यास रस नाही. माझ्या मतदारसंघात मी किंग आहे. मला राजकारण करायचे नाही. यापूर्वी दोन वेळा राजीनामा… Read More »

मराठा क्रांती मोर्चा वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध : अफवांवर विश्वास ठेवू नका

औरंगाबाद – मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास, पंढरपूर परिसरापासून दूरच रोखावे, असा निर्णय औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे. नुकतेच वारीतील काही संघटनांचा वारकऱ्यांना इजा पोहोचविण्याचा डाव असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा… Read More »

आदल्या दिवशी गटारात .. दुसऱ्या दिवशी ठेल्यावर पाणी मारून : मुंबईतला प्रकार

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात लघुशंका करून लोकांना पाणीपुरी विकण्याचा निर्लज्ज प्रकार एका उत्तर भारतीय व्यक्तीने केला होता . एका मुलीने अपार्टमेंट मधून हे शूट केले आणि पुढे मनसे कार्यकर्त्यांनी त्यास चोप दिला. नंतर मनसे कार्यकर्ते एका फळविक्रेत्यास मारहाण करताना देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.मुंबईकरांना विकणाऱ्या गोष्टींबद्दल उत्तर भारतीय फेरीवाले अजिबात जागरूक नाहीत. महापालिका… Read More »

तीन वर्षांतील राष्ट्रभक्तीच्या नगदी पीकास हमीभाव मिळणार की नाही ? :सामनामधून सरकारवर टीकास्त्र

आजच्या सामनामधून सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. चित्रपटगृहात सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक नसल्याचा निर्णय नुकताच दिला होता,त्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालय देखील आपल्या भूमिकेवरून पलटी का मारते ? असे देखील विचारले आहे . आपल्याला हवे ते न्यायालयाकडून बदवून घेण्याची वदवून घेण्याचा नवा पायंडाही पडला आहे. न्यायालये देखील सरकारच्या भूमिकेत शिरली आहेत, असा देखील टोमणा… Read More »

संतापजनक : माधवी जुवेकर तुमच्यासारख्या मराठी अभिनेत्रीकडून ही अपेक्षा नव्हती

आपण सेलेब्रिटी असाल तर आपले वैयक्तिक आयुष्य असते हे आम्ही समजू शकतो. आपल्या खाजगी आयुष्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही . मात्र ज्यावेळी आपण सेलेब्रिटी असता आणि पब्लिक मध्ये वावरत असता त्यावेळी किमान आपले फॅन दुखावले जाणार नाहीत आणि आपली संस्कृती यांचे किमान भान तरी ठेवायला हवे . हिंदीत असलेला हिडीस प्रकार आता हळू हळू… Read More »

मनात आणले तर २४ तासात मुख्यमंत्री बदलू शकतो : शिवसेनेचे प्रतिआव्हान

तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी भाजप आणि शिवसेनेची परिस्थिती आहे . मात्र मध्यवर्ती निवडणुका सध्या कोणालाच परवडणाऱ्या नसल्याने राज्याचा गाडा दोघे मिळून ओढताहेत असे साधारण चित्र आहे . एकमेकांवर टीका केल्याशिवाय दोन्ही पक्षाचा एकही दिवस जात नाही. मात्र अच्छे दिन येण्याच्या आशेवर बसलेल्या लोकांचे यामुळे चांगले मनोरंजन करण्याचे काम दोन्ही पक्ष करत आहेत.… Read More »

प्रेरणादायी : सॅमसंग नोकिया मोटोरोला आणि डीएसके ग्रुपचे जुने धंदे काय होते ?

संघर्ष हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.आज सॅमसंग,नोकिया मोटोरोला ह्या कंपन्या खूप मोठ्या झाल्या असल्या तरी त्यांचा इतिहास देखील खूप संघर्षाचा राहिला आहे . सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची शेकडो उपकरणं आज देशातील आणि परदेशातील बाजारात आहेत, पण सॅमसंग सर्वात जास्त नावारूपाला आली ती मोबाईल कंपनी म्हणून. सॅमसंगचा मोबाईल वापरला नाही असा माणूस भारत सापडणे देखील… Read More »

अंधार पडला म्हणजे भारनियमन सुरु झाले असे नाही

मधले काही दिवस महाराष्ट्र भारनियमनाच्या त्रस्त झाला होता. पाऊस आणि त्यात लाईट नाही अशीच काय ती स्थिती होती. मात्र दिवाळीत भारनियमन होणार नसल्याची ग्वाही ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. महाराष्ट्रात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळशाची टंचाई होती आणि त्याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले… Read More »

‘ असे ‘ बनतात टुकार मराठी सिनेमे : ऍक्टर डायरेक्टरसाठी.. डायरेक्टर प्रोड्युसरसाठी.. प्रोड्युसर पैशासाठी

बऱ्याच दिवसांपूर्वी मी लहान मुलांच्या सोबत एक खेळ खेळायचो .. एका मुठीत चॉकलेट आणि एक मूठ रिकामी .. लहान पोरगा यायचा आणि मूठ उघडून बघायचा .. चॉकलेट दिसलं कि पोरगा खुश व्हायचा अन मूठ रिकामी दिसली कि जरा नाराज व्हायच पण जिद्द सोडत नव्हता .. पुढे पुढे मी मुठीत चॉकलेट ठेवणेच बंद केले .. तरी… Read More »

सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »