Tag Archives: महाराष्ट्र नवनिर्माण सेना

ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता : राज ठाकरे यांचे नवीन व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्राने भाजपवर निशाणा साधला आहे. ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर यश मिळाले होते. हे यश ईव्हीएम मशीनचीच करामत असल्याची टीका याआधी मायावती यांनी देखील केली होती आणि… Read More »

अखेर ‘ तो ‘ हल्ला मनसेकडूनच : इट का जवाब पथ्थर से मिलेगा

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटी येथील कार्यालयावर शुक्रवारी सकाळी हल्ला झाला. सुरुवातीला हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल स्पष्टता नव्हती. काहीवेळाने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून मोठया प्रमाणावर तोडफोड केली. काँग्रेस कार्यालयातील केबिनच्या काचा फोडल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे.मोठया प्रमाणावर ही नासधूस करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण… Read More »

काँग्रेसचा अब्दुल अन्सारी धरला..पनवेलमध्ये फेरीवाल्यांना मारहाण : मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर

काल दि. २६ ला संध्याकाळी मुंबईच्या विक्रोळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विटने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले. मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मार देणारे हवेत असे सांगितल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत… Read More »

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

मालाडच्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यानंतर परत एकदा विक्रोळीतील मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये ते मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा… Read More »

‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

रातोरात मनसेला जय महाराष्ट्र करून गेलेले ते ६ नगरसेवक सध्या शिवसेनेत असले तरी पक्षांतर करण्याऱ्या ह्या ६ नगरसेवकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडं याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आपले स्पष्टीकरण देताना ह्या सहा नगरसेवकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत… Read More »

जमिनीवर बसलेले राज ठाकरे पहिले का कधी ? : नाशिकमध्ये संवाद

मनसेचे मुंबईतील सहा नगरसेवक शिवसेनेने पळवल्यापासून मनसेला जो धक्का बसला त्यातून मनसे सावरण्याचा प्रयन्त करत आहे . अत्यंत अनपेक्षित अशा ह्या फुटीमुळे किंगमेकर राहण्याची संधी मनसेने गमावली तर भाजपाला देखील मुंबईतून स्वतःचा महापौर बसवण्याचे स्वप्न भंग पावले. मनसेच्या नेतृत्वाबद्दल कायम सगळ्यांची तक्रार म्हणजे राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत , त्यांना कार्यकर्त्यांना समजावून घ्यायला वेळ नाही… Read More »

मनसे कार्यकर्त्यांवर दरोड्याचे गुन्हे लावायला पुण्यातून सुरुवात

पुणे येथे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या , त्यांचा माल रस्त्यावर फेकून त्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर आज पुण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त झी मीडियाने दिले आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड रोड आणि फर्ग्सुसन कॉलेज रोड परिसरात रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर हल्लाबोल केला होता. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा पॅटर्न मनसेने आता पुण्यात देखील राबवायला सुरु… Read More »

पोलीस परवानगीला ठेंगा दाखवत मुंबईत फेरीवाले आक्रमक : उचलले ‘ हे ‘ पाऊल

मुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये काही अघटित होऊ शकते ह्या करणाऱ्याने पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा होणारच ह्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे . हा मोर्चा संजय निरुपम… Read More »

जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच – राज ठाकरे

एल्फिन्स्टन – परळ स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची प्रशासनाला मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन करत ठाणे, कल्याण आणि डोंबिवली स्थानकाबाहेर तोडफोड केली होती. पुढे जाऊन आंदोलन… Read More »

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे : रामदास आठवले

ठाणे येथील फेरीवाल्याना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर संजय निरुपम यांनी , मुख्यमंत्री देवेंद फडणवीस मनसे वर कारवाई का करत नाहीत ? असा आरोप केला होता तसेच सरकारचे राज ठाकरे यांना छुपे समर्थन आहे असेही निरुपम म्हणाले होते . या वादात आता रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे . गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण… Read More »