Tag Archives: मराठी न्यूज

जेव्हा चक्क पोलिसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ येते : सत्यघटना

भोकरदन पोलिसांनी चोरीच्या संशयावरून सिरसगाव मंडप येथून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. पण या शेळ्यांचा मालक काही पोलिसांना सापडेना त्यामुळे पोलीस गेल्या २४ तासापासून ३४ शेळ्या सांभाळत आहेत . चोरीच्या शेळ्या असल्याच्या संशयावरून भोकरदन पोलिसांनी बुधवारी सिरसगाव मंडप येथील शेख अन्सार यांच्या घरासमोरून ३४ शेळ्या ताब्यात घेतल्या होत्या. याबाबत शेख अन्सार यांच्याकडे चौकशी केली असता,… Read More »

सेनेचे राजीनामे खिशातच राहणार : सत्तेत राहण्याबद्दल अद्यापही ठोस भूमिका नाहीच

आम्ही २५ सप्टेंबर लाच याबद्दल एक पोस्ट टाकली होती. दसरा मेळाव्यात शिवसेना भाजप वर तोंडसुख घेण्यापलीकडे काही करणार नाही आणि शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचे सांगितले होते . अखेर आजही शिवसेनेने दसरा मेळाव्यात सत्तेत राहण्याबद्दल बद्दल अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही . आम्ही सत्तेतही आहोत आणि विरोधातही असे सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत . उद्धव ठाकरे… Read More »

‘ ह्या ‘ मुस्लिम देशाला गाय देणार आधार

ऐकायला विचित्र वाटेल पण हा मुस्लिम देश देखीलआता मुस्लिम राष्ट्रांनी बंदी घटल्यानंतर शेवटी गायीच्या आश्रयाला आलाय .. हो ही बातमी खरी आहे .. ह्या लहानश्या खाडी देशात २७ लाख लोक उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमधून आपले पोट भरू शकणार नाही आपण बोलतोय कतर बद्दल , सध्या कतर अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर युरोपीय देश व शेजारील देशातून आयात… Read More »

बाबावाचून करमेना : मीडिया पोलिसांना संपवून टाकण्याची धमकी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिमला दोन साध्वी वर बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. सूंभ जळाला तरी पीळ जात नाही अशी बाबाच्या भक्तांची अवस्था आहे . डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील काही पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाचे माजी अनुयायी ज्यांनी बाबाच्या विरोधात आवाज उठवून बाबाला आत पाठवले, त्या सर्वाना आम्ही… Read More »

विवाहास नकार दिला म्हणून रागातून खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

विवाहास नकार दिला म्हणून रागातून नाशिक येथील तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ पळसे येथील… Read More »

राणेंवर आरोप : प्राप्तिकर विभागात शिपाई असलेल्या माणसाचा अंबानीच्या तोडीचा बंगला कसा ?

राणे हे प्राप्तिकर विभागात पहिले शिपाई होते. त्यानंतर दहावीची परीक्षा देऊन लिपिक झाले. पण आज त्यांनी मुंबईत उद्योगपती धीरूभाई अंबानीच्या खालोखाल बंगला कसा बांधला हे कसे काय शक्य झाले? त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल करीत कोणत्याही ठेकेदाराकडून जरूर प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. अनेक ठेकेदार हे त्यांचेच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही आजची जिल्ह्याची अवस्था आहे… Read More »

अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?

नोटबंदीतून काळा पैसा बाहेर आल्याचे चित्र निर्माण केले गेले. परंतु प्रत्यक्षात सर्व चलन परत आले. जी.एस.टी. तीव्र विरोध करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर तोच कायदा लागू केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी तीन वर्षांत महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय ते दिसतच आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी… Read More »

आणि ‘म्हणून ‘ दाऊद भारतात फोन करत नाही : इकबाल कासकर

खंडणी प्रकरणी अटकेत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खंडणी प्रकरणी अटक केलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीदरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असून त्याचा फोन टॅप होईल या भीतीने दाऊदने गेल्या तीन वर्षांपासून भारतात फोन केलेला नाही, असे इक्बाल म्हणतो. बिल्डरांकडून… Read More »

नाशिकचे ‘ हे ‘ व्यावसायिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

रोखीत व्यवहार करून त्याच्या नोंदी न ठेवणारे बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, कोचिंग क्लासेस आदी घटक प्राप्तीकर विभागाच्या रडारवर असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे चिन्हे आहेत. देशात हळूहळू प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्राप्तिकर संकलनाद्वारे सरकारला उत्पन्न मिळवून देण्यात देशात उर्वरित महाराष्ट्र विभाग हा द्वितीयस्थानी आहे.नाशिक विभागात कर संकलन चांगले असले तरी परतावा द्यावा लागण्याचे प्रमाणही अधिक… Read More »