Tag Archives: भाजप

दुर्दैवी : आज मुंबईत जेलभरो आणि मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत तब्बल इतक्या आत्महत्या

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. 9 आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे ह्या युवकाच्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाची धग सरकारला देखील जाणवू लागली आहे . मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले असून आणखी… Read More »

एक वेळ मोदी परवडले पण ..: राज ठाकरे यांनी कोणावर केली आगपाखड ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत नोटाबंदी आणि इतर मुद्द्यांवर टीका केली. या भाषणात त्यांनी एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण मोदीभक्त नकोत असा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली रे झाली की भक्त बोलायला लागतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बोलायचे नाही अशीच भूमिका घेतली… Read More »

लोकशाहीचा गळा घोटणारा पार्ट ३ : २०१९ ला समोर ठेवून लोकशाहीच्या मुस्कटदाबीचा तिसरा प्रयत्न

भाजप सरकारला आता निवडणुकीत बसलेला फटका कशामुळे याचे अजून देखील आकलन करण्यात यश आलेले नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचे प्रकार सरकारने सुरु केले आहे, असे दिसते आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे धर्मकार्य भाजपकडूनच करण्याचे वेगवेगळे प्रकार सध्या अवलंबले जात आहे . कोब्रा पोस्टच्या स्टिंग ऑपरेशनने सगळ्या टीव्ही चॅनेल ची पोल… Read More »

पेड मीडियाचा पर्दाफाश करणारे कोब्रापोस्टचे हिडन कॅमेरा स्टिंग ऑपरेशन : ‘ हे ‘ चॅनेल अडकले जाळ्यात

शुक्रवारी एक वेबसाईट कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतातील नामांकित चॅनेलच्या छुप्या अजेंड्याचा पर्दाफाश झालेला असून सर्वच चॅनेलचे ह्या दाव्याने धाबे दणाणले आहे . अर्थात आता अशा मिडीयाचीच नाचक्की झालेली असल्याने ते यावर काही बोलणार नाहीत म्हणून मीडिया शांत आहे . ह्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमांतून मीडिया हाऊस पैसे मिळाले कि एकाच पक्षाला हा फायदा मिळावा… Read More »

कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी खेळलेला भाजपचा ‘ हा ‘ डाव देखील फसला : कर्नाटक बहुमत चाचणी

भाजपने कितीही आव आणला तरी कर्नाटकाचा डाव फसल्याचे दुःख खूप मोठे झाले आहे . असाच आणखी एक डाव भाजपने कर्नाटकमध्ये खेळाला होता मात्र तो देखील आता फसला आहे . कर्नाटकात बहुमत चाचणीपूर्वी जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपनं खेळलेला हा डाव देखील औटघटकेचा ठरला. बहुमत चाचणीआधी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात भाजपने एस. सुरेश कुमार… Read More »

तर कुमारस्वामी देखील होऊ शकतील अडीच दिवसांचे मुख्यमंत्री : 12.15 ला होणार चित्र स्पष्ट

भाजपाविरोधी काँग्रेसशी आघाडी करून सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार असल्याने कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकतील, असे चित्र आहे.मात्र भाजपचे धुरंधर अजूनही काही चमत्काराच्या आशेवर आहेत . विधानसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास… Read More »

नाव शिवरायांचे काम अफझलखानाचे वि. मर्दासारखे लढा फक्त निवडणुकीपुरते भूंकू नका

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपने कट्टर हिंदुत्ववादी चेहरा असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पालघरच्या रणांगणात उतरवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नालासोपाऱ्यात तर योगी आदित्यनाथ यांनी विरारमध्ये प्रचार सभा घेऊन एकमेकांविरोधात घणाघाती टीका करत प्रचारात आणखीच रंगत आणली आहे. कर्नाटकमध्ये बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता… Read More »

काँग्रेस जेडीएस मध्ये ‘ हा ‘ नवीन वाद उफाळला : कर्नाटक विधानसभा निवडणूक

जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.गुरुवारी शपथविधी असून अद्याप देखील कोणताच निर्णय झालेला नाही. जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं… Read More »

‘ हा ‘ एक पाटील ठरला अख्ख्या भाजपाला भारी : कर्नाटकमध्ये भाजपचा वाजलेला गेम

सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतच होत्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला सपशेल अडकवून एक्सपोज करण्याची रणनिती काँग्रेसने आधीपासूनच आखली होती. भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने एकूण सहा ऑडियो क्लिप जारी… Read More »

‘ म्हणून ‘ कुमारस्वामी यांचा शपथविधी आज नाही : ह्या तारखेला होणार शपथविधी

कर्नाटकात येत्या सोमवारी नवीन सरकार अस्तित्वात येणार होते. पण आता शपथविधीचा दिवस बदलण्यात आला आहे. कुमारस्वामी आता सोमवार ऐवजी बुधवारी २३ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जनता दल सेक्युलरचे राष्ट्रीय सचिव दानिश अली यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी… Read More »