Tag Archives: पुणेकर

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

प्रेमप्रकरणातून फसवणूक झाल्यामुळे बऱ्याच वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते .प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्यामध्ये महिलांचे प्रमाण हे लक्षणीय आहे .आपल्या मित्राने फसवले अशी भावना झाली कि बऱ्याचदा हा निर्णय घेतला जातो. अशीच एक घटना पुणे येथील पिंपरी चिंचवडला घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. पूजा सुनील आल्हाट (वय २२ रा.मोशी) असे मृत तरुणीचे… Read More »

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे जिल्ह्यातील सासवड येथील व्यापारी अरविंद चौधरी यांच्या मुलाच्या झालेल्या खुनाचा अखेर शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून, हा खून मृतक सचिन अरविंद चौधरी (वय २६ ,सासवड, ता. पुरंदर ) याची पत्नी अर्चना सचिन चौधरी (वय 20) व तिचा प्रियकर बलवान उर्फ बाळू तानाजी आष्टे (वय 25, मूळ, कर्नाटक, सध्या रा. ससाणेनगर, हडपसर – पुणे)… Read More »

बेशिस्त वाहतुकीचा पुण्यात आज आणखी एक बळी : ‘ हे ‘ आहेत सर्वाधिक अपघाताचे पुण्यातील ब्लॅक स्पॉट

पुण्यातील आकुर्डी येथे डंपरने दिलेल्या धडकेत इंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून .डंपर चालकाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आशिष दिपक पाऊसकर (वय, २२ शुभश्री सोसायटी, आकुर्डी) याचा सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघात मृत झालेला विद्यार्थी सिम्बॉयसिस महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.तो मूळचा मुंबईचा असून आईसोबत… Read More »

पुण्यामध्ये ८ महिन्यात अपघातात २४२ बळी : ‘ हे ‘ आहेत सर्वाधिक अपघाताचे पुण्यातील ब्लॅक स्पॉट

पुण्यामध्ये गेल्या ७ महिन्यामध्ये तब्बल २४२ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून पुणे शहर वाहतूक संघटनेने ३६ कायम अपघात होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार केली आहे . याला ब्लॅक स्पॉट असं नाव दिलाय. यावर उपाय योजना करावी असा प्रस्ताव पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे . पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये अपघातांचे प्रमाण वाढतच… Read More »

‘म्हणून ‘ ह्या अकरावीतल्या विद्यार्थ्याने केला शिक्षकावर कोयत्याने हल्ला : वाघोलीतील घटना

पुण्यात नगर रोड येथील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला . वाडेबोल्हाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी सुनील पोपट भोर हा अकरावीमध्ये… Read More »

…धमकी देणाऱ्याने माझा इतिहास तपासावा : तुकाराम मुंढे

धमकी देणाऱ्याने सर्वप्रथम माझा इतिहास तपासावा, असे सांगत पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी कोणताही निर्णय बदलणार नाही असे ठणकावून सांगितले .मुंढे यांना काल पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली होती. . मुंढे यांनी पीएमपीएमएल कारभाराचा सद्य स्थितीचा आढावा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही गोष्ट बोलवून दाखवली. धमकी पत्राबद्दल अधिक… Read More »